sunita gawade sakal
पुणे

वाबळेवाडी शाळा : वारे यांच्या निलंबनाची मागणी माझी नाहीच!

वाबळेवाडी प्रकरणात सुनीता गावडे यांचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर : वाबळेवाडीचे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांच्या निलंबनाच्या प्रकरणात आपण तशी मागणी केलीच नव्हती, असा खुलासा जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांनी केला. शिक्षण क्षेत्राला सार्वजनिक जीवनात कधीच टार्गेट केले नसल्याचे त्यांनी सांगितले.जुलैमधील सर्वसाधारण सभेत सुनीता गावडे, सविता बगाटे व सुजाता पवार या शिरूरमधील तीन जिल्हा परिषद सदस्यांनी मागणी केल्यावरून वारे यांचे निलंबन झाले होते. या तिघीही वाबळेवाडी शाळा ज्या शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटात आहे, त्या गटातील नाहीत. (demand for suspension of vare is not mine)

कारवाईवरून वाबळेवाडी शाळा राज्यात चर्चेत असताना शनिवारी (ता.२५) माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यादरम्यान सुजान चाटे या इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्याच्या निवेदनावरून श्रीमती गावडे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, वाबळेवाडी शाळेबद्दलचा विषय स्थायी समितीत होत होता आणि त्यादिवशी नेमका सर्वसाधारण सभेत घेतला गेला. या प्रकरणी सर्वांचे ऐकून सीईओ आयुष प्रसाद केवळ हसत पाहत असताना मी एवढंच म्हणाले की, आमच्या तालुक्यातील विषय आहे, त्याबद्दल नेमकी काही तरी तुम्ही भूमिका घ्या व कार्यवाही करा. माझ्या बोलण्यात कुठेही वाबळेवाडी शाळेची चौकशी करा, वारे गुरूजींवर कारवाई करा असे म्हटले नव्हते. मात्र मीच तक्रार केल्याचे जाहीर झाले, हे चुकीचे आहे. कारण माझे सासरे पोपटराव गावडे व परिवाराने कधीही शाळा, शिक्षक यांच्या विरोधात विरोधात भूमिका घेतली नाही. वारे गुरुजींचे स्थान मोठे आहे, शाळा राष्ट्रीय पातळीवर गेलीय, हे मला ठाऊक होते, असेही त्या म्हणाल्या. यासंदर्भाने भाजपचे गटनेते शरद बुट्टेपाटील यांनीही ‘अशा शिक्षकांना धाक पाहिजे’ म्हणून भूमिकाच मांडली होती, मात्र बैठकीनंतर वाबळेवाडी शाळा आणि वारे गुरुजींच्या प्रकरणी कुठलीच माहीत नव्हती, असे त्यांनी सांगितल्याची माहितीही गावडे यांनी दिली.(vare Guruji's place is big, the school has gone to the national level)

माझ्या गटातील मिडगुलवाडी शाळेत फियाट कंपनीने काम केले आणि तिथे उद्‌घाटनाला सीईओ परस्पर गेले. वास्तविक, त्या कामाची मागणी माझी होती. मी पाठपुरावाही केला होता. तरीही मी नाराज नाही. गेल्या १५ वर्षांत मी कधीच कुठल्या शिक्षकांना त्रास होईल अशी भूमिका ठेवली नाही.

- सुनीता गावडे, जिल्हा परिषद सदस्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT