onion
onion 
पुणे

पुरंदरचा कांदा गाजवतो बेळगावचे मैदान 

योगेश कामथे

खळद (पुणे): गराडे (ता. पुरंदर) येथील कांदा उत्पादक शेतकरी मारुती हरिभाऊ घारे व संभाजी ग्यानबा घारे यांचा बेळगाव येथील एपीएमसीत मार्केट येथे दर्जेदार कांदा घेऊन आल्याबद्दल सर्व खरेदीदार, व्यापारी यांच्याकडून विशेष सत्कार करण्यात आला. 


हा कांदा टिकाऊ व दर्जेदार असल्याने बाजारात या कांद्याला अधिक मागणी होती. सातत्यपूर्वक गेल्या चाळीस वर्षांपासून बेळगावच्या एपीएमसीमध्ये हे शेतकरी कांदाविक्रीसाठी जात असल्याने सर्वत्र दर्जेदार उत्पादन करणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.

नेहमीप्रमाणे आठ दिवसांपूर्वी ते कांदा घेऊन गेले असता त्यांच्या कांद्याला सहा हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला व त्याला मागणीही चांगली होती. इतर भागातून आलेल्या कांद्यापेक्षा हा कांदा सर्वोत्तम असून, चाळीस वर्षांपासून बेळगावला या दोन शेतकऱ्यांकडून कांदा विक्रीसाठी आणला जातो, याबद्दल कांद्याचे व्यावसायिकदार अतुल होनगेकर व माणिसंभाजी ग्यानबा घारेक ट्रेडर्स यांनी त्यांचे आभार मानले. 


बेळगावच्या मार्केटमध्ये आमच्या वडिलांपासून कांदा विक्रीसाठी नेला जातो. या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर वजन घेतले जाते. त्याचबरोबर ज्या दिवशी विक्री होईल त्याच दिवशी कांद्याची पट्टी व रक्कम दिली जाते. पण, इतर ठिकाणी मात्र 15 ते 20 दिवसांनंतर पट्टी व रक्कम दिली जाते. 
- संभाजी घारे, शेतकरी 

शेणखत व ठिबक सिंचनावर पिकविलेला जवळपास 700 पिशवी कांदा होळी पौर्णिमेला काढला व गुढीपाडव्याला वखारीत ठेवला. ऑगस्टपासून आजपर्यंत थोड्याफार प्रमाणात विक्रीसाठी नेण्यास सुरुवात केली. आजही 50 पिशवी कांदा शिल्लक आहे. 
- मारुती घारे, शेतकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेबाबत मोठी अपडेट; उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले..

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT