खांदेरी किल्ला (जि. रायगड) - गडावरील प्रत्येक दगडावर प्रेमवीरांनी आपल्या जोडीदाराचे नाव कोरल्याने किल्ल्याची झालेली दुरवस्था.
खांदेरी किल्ला (जि. रायगड) - गडावरील प्रत्येक दगडावर प्रेमवीरांनी आपल्या जोडीदाराचे नाव कोरल्याने किल्ल्याची झालेली दुरवस्था. 
पुणे

ऐतिहासिक ठेवा जपण्याची शिव-श्री प्रतिष्ठानची मागणी 

सकाळवृत्तसेवा

कोथरूड - छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेमुळे गड, किल्ले पाहण्याच्या, ऐतिहासिक वैभव अनुभवण्याच्या इच्छेने अनेक युवक विविध किल्ले, दुर्ग, गडकोटांवर आदरयुक्त व अभ्यासपूर्ण अशी भटकंती करीत असतात. या वास्तू उभारण्यासाठी व टिकवण्यासाठी हजारोंनी आपले प्राण पणाला लावले आहेत याची आठवण त्यांच्या मनात सतत असते, परंतु ऐतिहासिक स्थळावर गेल्यावर तेथील वास्तूंना पोचविलेली हानी पाहिली, की अनास्था दाखविणाऱ्यांबद्दल मनात संताप येतो, त्यामुळे गडकिल्ल्यांच्या पावित्र्याला हानी पोचविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी  शिव-श्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिव-श्री प्रतिष्ठानचे संस्थापक सागर शेडगे म्हणाले की, प्रतिष्ठानच्या सदस्यांनी रविवारी छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला खांदेरी-उंदेरी बघायला जायचे ठरवले. त्यासाठी पहाटे चार वाजायच्या आतच बसस्थानकावर गेलो. उंदेरीचा किल्ला सध्या बंद आहे. खांदेरी हा जलदुर्ग. पूर्ण पाण्याने वेढलेल्या या किल्ल्याबद्दलची माहिती वाचून त्याबद्दल खूपच उत्सुकता निर्माण झाली होती.

आम्ही बोटीत जाऊन बसलो. सोबत फारसे लोक नव्हते. त्यामुळे या भागात किल्ला बघायला फारसे लोक येत नसावे असे वाटले, पण बोटीतून उतरताच भ्रमनिरास झाला. समोर लोकांची बेफाम गर्दी. सगळेच दारूच्या धुंदीत असलेले.  एवढ्या लांबचा प्रवास करुन आम्हाला तेथे काय पाहायला मिळाले तर किल्ल्यामधील वेगवेगळ्या शेडमध्ये टोळक्याने आलेले लोक. जे सोबत दारुची खोकी आणि स्पिकरच्या भिंती घेऊन आले होते. 

कानठळ्या बसतील अशा आवाजात बेधुंद होऊन नाचत होते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT