memu train sakal
पुणे

Memu Train : ‘डेमू’ दुरुस्तीला; मेमू तात्पुरत्या ट्रॅकवर

पुणे-दौंड दरम्यान सात वर्षांनंतर धावली मेमू

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे-दौंड दरम्यान मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) धावण्यास सुरुवात झाली आहे. सात वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘मेमू’ या सेक्शनमध्ये धावत आहे. दौंडचे प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून ‘मेमू’ रेल्वेची मागणी करीत होते. ती आता काही दिवसांपुरती तरी पूर्ण झाली आहे. पुणे-दौंड दरम्यान नियमितपणे धावणाऱ्या डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) रेक देखभाल व दुरुस्तीसाठी माटुंगा येथे गेला आहे. त्या बदल्यात ‘मेमू’चा रेक धावत आहे.

पुणे ते दौंडदरम्यान विद्युतीकरण झाल्यानंतरही डिझेलवर धावणारी ‘डेमू’ धावत आहे. विद्युतीकरण झाल्याने विजेवर धावणाऱ्या ‘मेमू’चा रेक सुरू करावा, अशी मागणी दौंडच्या प्रवासी संघटना करीत होत्या. शिवाय ‘डेमू’च्या तुलनेत ‘मेमू’ला चार डबे जास्त आहेत. त्यामुळे जास्त प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हाच ‘मेमू’चा रेक कायमस्वरूपी राहावा, यासाठी प्रवासी व प्रवासी संघटना आग्रही भूमिका घेण्याची शक्यता आहे.

हा रेक तात्पुरता

पुणे विभागाचा ‘डेमू’चा रेक देखभाल व दुरुस्तीसाठी माटुंगा येथे गेला आहे. १६ जूनपासून तो पुन्हा पुणे विभागाला मिळणार आहे. दरम्यान पुणे- दौंडच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात ‘मेमू’चा रेक घेतला आहे. माटुंगाहुन ‘डेमू’चा रेक आल्यानंतर ‘मेमू’ पुन्हा भुसावळला देण्याची शक्यता आहे. हा रेक भुसावळला गेला तर पुणे ते दौंड दरम्यान पुन्हा ‘डेमू’ धावण्याची शक्यता आहे.

पुण्याला दिलेला रेक आमचा आहे. आम्ही तो स्पेअर म्हणून दिला आहे. पुण्याला त्यांचा ‘डेमू’चा रेक मिळाल्यावर आम्ही आमचा ‘मेमू’चा रेक परत घेऊ.

- इति पांडे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ.

पुणे-दौंड दरम्यान ‘मेमू’ धावणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, पण ‘मेमू’चा रेक कायमस्वरूपी पुणे विभागाकडे राहणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आवश्यकता भासल्यास ‘रेल रोको’ करण्याचीदेखील आमची तयारी आहे.

- विकास देशपांडे, सचिव, पुणे-दौंड प्रवासी संघ.

‘डेमू’चा रेक देखभाल व दुरुस्तीसाठी माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये पाठविला आहे. त्यामुळे ‘मेमू’चा रेक वापरला जात आहे. मात्र हा रेक पुण्यातच राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT