Ajit Pawar Esakal
पुणे

पुणे जिल्हा बॅंकेवर उपमुख्यमंत्री पवार बिनविरोध

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत संचालकपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली.

मिलिंद संगई,

बारामती - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणूकीत संचालकपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली .

'अ' वर्ग सोसायटी प्रतिनिधी गटातून बारामतीतून अर्ज दाखल केलेल्या शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे पवार यांची बिनवरोध निवड झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनीही याच गटातून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूकीला सामोरे जावे लागणार की ते बिनविरोध होणार याकडे लक्ष लागले होते.

जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीची जबाबदारी सोपविलेल्या ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी बुधवारी (दि. ८) सकाळी काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर काकडे यांनी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पवार यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध संधी मिळाली आहे.

यासंबंधी काकडे म्हणाले, सामाजिक कारणांसाठी मी अर्ज दाखल केला होता. पवार यांच्याशी सोमेश्वर कारखान्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यांनी काही प्रश्न मार्गी लावले, बाकीचे मार्गी लावतो असे आश्वासन दिले. वास्तविक जिल्हा बॅंकेशी काकडे घराण्याची पूर्वीपासून जवळीक आहे. बॅंक स्थापनेमध्ये स्व. मुगुटराव काकडे, स्व. बाबालाल काकडे यांचा सिंहाचा वाटा होता. सहकाराचा ही बॅंक कणा आहे. पवार यांच्यासारखा कणखर नेता तेथे असणे गरजेचे असल्याने मी अर्ज मागे घेतला. मी शेतकऱयांसाठी काम करतो. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT