Deputy CM Ajit Pawar gives booster dose to Baramati Municipal council 
पुणे

अजित पवारांनी दिला बारामती नगरपालिकेला बूस्टर डोस

मिलिंद संगई

बारामती : सत्ताबदलानंतरची गोड फळे कशी असतात याचा प्रत्यय या पुढील काळात बारामतीकरांना येणार आहे. बारामती नगरपालिकेची अनेक विकासकामे येत्या काही महिन्यातच मार्गी लागणार आहे. तब्बल 120 कोटींच्या घसघशीत निधीचा बूस्टर डोसच अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामती नगरपालिकेस दिला असून आता निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाची धावपळ होणार आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यासह सर्वच नगरसेवक सध्या रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत. ज्या बारामतीकरांनी राज्यात विक्रमी मताधिक्य दिले, त्या बारामतीकरांसाठी सत्तेचा वापर योग्य रितीने करुन रखडलेली सर्व विकासकामे वेळेत मार्गी लावण्यासाठी अजित पवारांनी बैठकांचा धडाका सुरु केला आहे. गेल्या आठवडाभारापासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर अक्षरशः पुणे व मुंबईच्या वाऱ्या करीत आहेत. 

या 120 कोटींपैकी पहिला 92 कोटींचा हप्ता लवकरच नगरपालिकेला प्राप्त होणार असून आता कामे शासकीय नियमावलीत बसवून निविदा प्रक्रीया राबवून कामे सुरु करुन ती वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. अजित पवार यांचा कामाचा वेग पाहता त्या वेगाला प्रशासनातील जे अधिकारी कर्मचारी टिकणार नाही त्यांची सुट्टी होणार हे आता निश्चित आहे. 
शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी दोन महिने पुरेल इतके पाणी कायम साठवण तलावात राहण्यासाठी नवीन साठवण तलाव निर्मिती होणार असून बारामतीकरांना आगामी वर्षात 365 दिवस 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
 दीडशे एकरांमध्ये तांदुळवाडीतील गट क्रमांक 100 मध्ये वनविहार प्रकल्प व पक्षीनिरिक्षण केंद्र, सर्पोद्यान तसेच प्राणी संग्रहालयाची आराखडा तयार करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. 

हद्दवाढीमध्ये 2500 नवीन स्ट्रीटलाईट बसवायचे असून अत्याधुनिक ई टॉयलेटचीही संकल्पना बारामतीत राबविली जाणार आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी चांगली घरे देण्याच्या कामालाही गती मिळणार असून पालखी विकास आराखड्यातून नगरपालिकेला साडेचार कोटींची यंत्रणा मिळणार आहे. भिगवण रस्त्यावर मुख्य रस्ता व सेवा रस्त्यादरम्यान सुशोभिकरण होणार असून परदेशाच्या धर्तीवर याचा विकास होणार आहे. 
रस्त्यांची स्वच्छता होणार यंत्रांनी....

बारामतीच्या स्वच्छतेला अजित पवारांनी प्राधान्य दिले असून रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी रोडस्वीपर्सचा वापर आगामी काळात होणार आहे. या साठी साडेचार कोटींचे अनुदान नगरपालिकेला मिळणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT