पुणे

आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी तरुणांमध्ये "डिझायर डर्मिटोलोजी'चा ट्रेंड 

सकाळवृत्तसेवा

पुणे : सुंदर दिसण्यासाठी "डिझायर डर्मिटोलोजी'चा ट्रेंड तरुणांमध्ये सध्या लोकप्रिय होऊ लागला आहे. गालावरचे पिंपल्स काढण्यापासून ते त्वचा उजळविण्यासाठी तरुणाईचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे त्वचारोग तज्ज्ञांच्या ओपीडी "हाऊसफुल' होऊ लागल्या आहेत. 

नायटा, कोड, खरुज अशा विविध त्वचा रोगासाठी डॉक्‍टरांकडे जाणाऱ्यांचे प्रमाण पूर्वांपार आहेच. परंतु आता सुंदर दिसण्यासाठी विविध उपचारांचा भाग म्हणून आवर्जुन डॉक्‍टरांची अपॉईन्मेंट घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात केवळ युवतींच नाही, तर युवकांचेही प्रमाण लक्षणीय आहे. व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसावे, चेहरा तजेलदार दिसावाड; तसेच गोरेपणाचे आकर्षण अन्‌ त्वचा तजेलदार करण्यासाठी उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण त्वचारोगतज्ज्ञांकडे वाढते आहे.

प्रदूषणाचाही त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळेही उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. शहरातील काही त्वचारोगतज्ज्ञांशी संवाद साधला असता, त्वचेच्या आजारापेक्षा सुंदर दिसण्यासाठी डॉक्‍टरांना येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. 

सुंदर दिसण्यासाठी... 

"डिझायर डर्मिटोलोजी'मध्ये काही क्रिम किंवा पावडर लावल्यावर पुरळ येणे किंवा आग होणे, अशा तक्रारी येतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करणे, केस गळणे, डोळ्या भोवतालची काळी वर्तुळे कमी करणे, सुडौल दिसणे, गरज असेल तर प्लॅस्टिक सर्जरी करणे, ऍब्रो सर्जरी करून भुवया आकर्षक करणे आदींसाठी उपचार घेण्यासाठी युवक-युवती त्वचारोक तज्ज्ञांकडे जात आहेत. टॅटूमुळे येणारी रिऍक्‍शन दूर करणे किंवा टॅटू कायमस्वरूपी पुसून टाकणे आदींसाठीही उपचार घेण्याऱ्यांची संख्या वाढली आहे. 

"लेझर ट्रिटमेंट' आता रूटीन 

त्वचा रोगतज्ज्ञ म्हणजे या पूर्वी डॉक्‍टर क्रिम लिहून देतात, असा समज होता. परंतु, आता शस्त्रक्रियांपर्यंत उपचारांची मजल पोचली आहे अन्‌ त्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात केली आहे. पिंपल्समुळे येणारे व्रण नाहीसे करणे, चेहरा तसेच शरीरावरील अनावश्‍यक केस काढून टाकण्यासाठी लेझर ट्रिटमेंट करणे हा अगदी रूटीन झाले आहे. कोड हे या पूर्वी आजार समजले जाई ; मात्र आता त्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीही आली आहे, असे त्वचारोग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. 

कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीच्या आहारी जाऊ नका, डॉक्‍टरांचा योग्य सल्ला घ्या, चौरस आहार आणि नियमित व्यायाम, हीच त्वचेच्या आरोग्याची गुरूकिल्ली आहे. 

- डॉ. सुरेश पेठे, त्वचारोकतज्ज्ञ 

त्वचारोगतज्ज्ञांच्या ओपीडीची चलती

हृदयरोग किंवा अस्थिरोगाच्या "ओपीडी'साठी 600 ते 800 रुपये शुल्क आकारले जाते. परंतु, आता त्वचारोगतज्ज्ञांच्याही ओपीडीमध्ये फी ची रेंज तेवढीच झाली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT