Zendu Flower sakal
पुणे

Zendu Flower : हताश शेतकऱ्यांनी झेंडूची फुले फेकली रस्त्यावर

दसऱ्याच्या मुहूर्तावर मार्केट यार्डात झेंडूची विक्रमी आवाक झाली. झेंडूच्या फुलांना ऐन सणात प्रतिकीलो ५-१० रुपये कवडीमोल भाव मिळाला.

प्रवीण डोके @pravindoke007

मार्केट यार्ड - दसऱ्याच्या मुहूर्तावर मार्केट यार्डात झेंडूची विक्रमी आवाक झाली. झेंडूच्या फुलांना ऐन सणात प्रतिकीलो ५-१० रुपये कवडीमोल भाव मिळाला. शेतकऱ्यांनी प्रयत्न करूनही फुले विकली गेली नाहीत. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी हताश होऊन रस्त्यावरच झेंडूची फुले फेकून दिली.

दसऱ्याला झेंडूच्या फुलासह सर्व प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. परंतु यंदा फुलांचे उत्पादन जास्त झाले. शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीसाठी आणली होती. परंतु अवाक जास्त आणि मागणी कमी राहिल्याने फुले विकली गेली नाहीत. त्यामुळे शिल्लक राहिलेली फुले शेतकऱ्यांना फेकून द्यावी लागली. या प्रकारामुळे फुलबाजार आणि शिवनेरी रस्त्यावर फेकून दिलेल्या फुलांचा खर्च पडला होता. सणामुळे काहीतरी पैसे मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी फुले बाजारात आणली होती.

सोमवारी झेंडूच्या फुलांना प्रती किलोला २० ते २५ रूपये भाव मिळत होता. मंगळवारी मात्र हा भाव अजूनच गडगडून तो प्रती किलोला ५-१० रुपयांवर आला होता. बाजारात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बीड, उस्मानाबाद येथून झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. विक्रमी आवक झाल्याने फुलांची विक्री होऊ शकली नसल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

दरवर्षी दसऱ्यानिमित्त फुले विक्रीसाठी शेतकरी फुले राखून ठेवतात. दसऱ्याला भाव मिळेल या आशेने ती बाजारात पाठवतात. यंदा मात्र आवक खूपच जास्त झाली. त्यामुळे झेंडूला म्हणावा तसा भाव मिळाला नाही. शेतकरी आणलेली फुले रस्त्यावर फेकून त्यांना परत जावे लागले.

- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल फुलबाजार अडते असोसिएशन

पावसामुळे फुलोत्पादक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोमवारी 100 कॅरेटमधून फुले पाठविली होती. त्यातील 25 कॅरेटच्या फुलांची 10 ते 20 रूपयांनी विक्री झाली. बाकी सर्व फुले शिल्लक राहिली. तसेच मिळणार्‍या दरातून वाहतूकीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे उर्वरित फुले रस्त्यावर फेकून गावी परतलो आहे.

- पांडुरंग निमकर, शेतकरी, सोलापूर

बाजार समितीने फुल बाजार, ट्रक पार्किंग, शिवनेरी रस्ता आणि नेहरू रस्त्यावर शेतकऱ्यांना फुले विक्रीसाठी जागा दिली होती. परंतु अवाक जास्त झाल्याने फुलांना भाव मिळाला नाही. राज्यभरात फुल उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोबदला म्हणून मदत जाहीर करणे गरजेचे आहे.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT