देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते canva
पुणे

...तर मागास समाजात कास्ट नाही पण, क्लास निर्माण होतील : फडणवीस

शरयू काकडे

पुणे : ''भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची भूमिका मांडताना 50 वर्षांसाठी आरक्षण ठेवले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यात वाढ दिली, पंतप्रधान मोदी यांनीही त्यात वाढ दिली. पण अजूनही बहूजन समाजाची अवस्था पाहता खूप काळ हे आरक्षण योग्य पध्दतीने राबवावे लागणार आहे. अजूनही समाजाचा मोठा घटक आरक्षणापासून दूर आहे.या वचिंत समाजाला आरक्षण मिळेल अशी व्यवस्था उभी करावी लागेल. वचिंतांमधील अतीवचिंताना आरक्षणाचा फायदा मिळायला हवा अन्यथा मागास समाजात कास्ट नाही पण क्लास निर्माण होतील. असे प्रतिपादन यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

रामभाऊ म्हाळगी आयोजित पदम् श्री पुरस्कार विजेत्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गिरीश प्रभूणे, पोपटराव पवार, सय्यद वैद, नामदेव कांबळे, सरस्वती सन्मान विजेते शरदकुमार लिंबाले यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मोदी सरकारनं पदम् पुरस्काराचे निकष बदलले आहेत. पदम् श्री पुरस्कार हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराची पध्दत बदलली आहे. आतापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळाले ते देशातील पदम् होतेच पण, जमिनीवर काम करणारी, सामान्य माणसांमध्ये काम करणारी, फारशी प्रसिध्दीच्या जोतात न येणारी मंडळी पुरस्कारापासून वंचित राहिली होते. यापैकी कोणीही पुरस्कारसाठी काम करत नव्हते पण, समाचाचे हे कर्तव्य होते की अशा लोकांनाही हा पुरस्कार दिला पाहिजे. कारण हा पुरस्काराच्या माध्यामातून समाजाला चांगल काम करण्याची प्रेरणा मिळते. आता सरकार नाही तर समाज सुचवेल कोणाला पुरस्कार दिला पाहिजे. आता अशा व्यक्तींना पुरस्कार मिळत आहे.''

''समाजामध्ये सकारात्मकता आणि शाश्वत परिवर्तन घडविण्याचे काम या पुरस्कर्त्यांनी केले आहे. समाजातील शाश्वत मुल्य जपण्याची काम हे लोक करतात. वर्षानूवर्षे मुलभूत कार्य केलल्यांचा हा गौरव. सय्यद भाई, गिरीष प्रभूणे सांरख्या व्यक्ती समाजात परिवर्तन घडवतात,'' अशा शब्दात फडणवीस यांनी पुरस्कार विजेत्यांचा गुणविशेष सांगून सत्कार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT