जेजुरी, ता. ५ : नव्याने तयार केलेल्या देवमळा ग्रामपंचायतीची पहिली ग्रामसभा दवणेमळा येथे घेण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पहिल्याच ग्रामसभेला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या विविध योजना व धोरणांचा यावेळी आढावा घेण्यात आला. नव्याने काही ठराव मंजूर करण्यात आले.
दवणेमळा, कुंभारकरवाडी, दोरगेवाडी, रेल्वेस्टेशन, खोमणेमळा, कुतवळमळा, कोळेकरमळा, जगतापवस्ती, कोरपडवस्ती, भंडारमळा आदी परिसरासाठी नव्याने देवमळा ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. सध्या पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सागर कांबळे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.
पहिल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक सागर कांबळे होते. यावेळी ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के, कृषी साहाय्यक पी. एम. नाईकनवरे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामासाठी जागेची चर्चा करण्यात आली. दिव्यांग कर्मचारी नोंदणी करण्याचे आवाहन केले. मालमत्ता कर आकारणी नोंदवही तयार करणे, कर्मचारी भरती करणे, पाणी टंचाई, ग्रामपंचायत हद्द, शासकीय योजनांची माहीती, प्राथमिक शाळा व शिक्षण याबाबत चर्चा केली.
ग्रामपंचायतीचे कार्यालय सर्वांना सोयीचे ठरावे यासाठी जेजुरी शहरातील जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये सुरू करावे, असे सुचविण्यात आले. जिल्हा परिषदेकडून मार्गदर्शन घेऊन
याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासकांच्यावतीने देण्यात आले. घर नोंदणी करण्यासाठी एजन्सी नेमण्यात येणार आहे. या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांबरोबर स्थानिक ग्रामस्थांनाही
सहभागी करून घ्यावे, असे सुचविण्यात आले. योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.