junnar
junnar 
पुणे

संकष्टी चतुर्थी निमित्त लेण्याद्रीला भाविक भक्तांची गर्दी 

दत्ता म्हसकर

जुन्नर - अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथे आज सोमवार ता.२६ रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी गर्दी केली होती. 
यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली होती. 

दिवसभरात हजारो भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ४ वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक व महाआरती करण्यात आली. 

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते. 

सकाळी ६ व दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात आली.देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांना विविध सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मंदिरात शिवेची वाडी येथील श्री मुक्ताई भजनी मंडळाचे भजन झाले. चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी सकाळी व सायंकाळी गर्दी केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जुन्नर व परिसरातुन तसेच पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. देवस्थान मार्फत भाविकांसाठी सुलभ दर्शन म्हणुन दर्शन मार्गावर व्यवस्था करण्यात आली होती. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT