junnar
junnar 
पुणे

कुकडेश्वर शिवालयात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा   

दत्ता म्हसकर

जुन्नर -  आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कुकडेश्वर ता.जुन्नर येथील प्राचीन हेमाडपंथी शिवालयात महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या दिवसभरात हजारो भाविकांनी स्वयंभू शिवलिंगाची पूजा करून दर्शन घेतले.

कुकडी नदीच्या उगमस्थान असलेले श्री क्षेत्र कुकडेश्वर   दुर्गम भागातील तीर्थक्षेत्र असून आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान मानले जाते. प्राचीन काळातील हेमांडपंथी प्रकारातील हे मंदिर असून मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम अ पूर्ण झाले परंतु कळसाचे काम झाले नाही. 
महाशिवरात्रीला येथे यात्रेच्या निमित्ताने जुन्नर,आंबेगाव, खेड यांसह मुंबई व पुण्यावरून आदिवासी समाजातील असंख्य भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.

पूर ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ता. 26 फेब्रुवारी ते 5 मार्च 2019 या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. हरीनाम सप्ताहात जयराम  दिवटे, रेवजी शेळकंदे.पांडुरंग लांडे, नाथा जोशी,  शांताराम कोकणे, निवृत्ती शेळके, काशीनाथ तळपे यांची कीर्तन प्रवचन सेवा पार पडली. मंगळवारी ता. 5 रोजी शंकर शिंदे यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडला.

यात्रा नियोजन सरपंच सुदाम दिघे, उपसरपंच रामदास दिवटे, ज्ञानेश्वर दिवटे, पुनाजी दिवटे, मंगेश मेमाणे यांसह ग्रामस्थांनी केले. महाशिवरात्री तसेच श्रावणी सोमवार निमित्ताने दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा उत्सव भरतो. मात्र वाहनतळाची ची व्यवस्था नसल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT