Dhairyashil Mohite Patil eSakal
पुणे

Pune News : धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश 'फिक्‍स', उमेदवारी मात्र गुलदस्त्यातच!

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धैर्यशील मोहिते पाटील यांचा होणार प्रवेश, शरद पवार यांनीच केली घोषणा.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणच्या लोकसभा जागांबाबतचा महाविकास आघाडी व महायुतीमधील तिढा सुटलेला असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडील माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

त्यातच माढ्यातील नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर खुद्द पवार यांनीच धैर्यशील हे दोन दिवसात पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर करून टाकले, पण उमेदवारीचा निर्णय मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवला !

भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. पक्षाने उमेदवारी देताना डावलल्याने धैर्यशील मोहिते यांच्यासह मोहिते पाटील घराण्यामध्ये चांगलीच नाराजी पसरली होती. तेव्हापासूनच धैर्यशील मोहिते पाटील हे वेगळी भूमिका घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात राजकीय सूत्रे वेगाने फिरली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट पवार यांच्या मोदीबागेतील निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मोहिते पाटील यांनी "पवार साहेबांचे व आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. आमची ही सदिच्छा भेट होती.

आता वेट ॲण्ड वॉच' असे सांगत उमेदवारीबाबत बोलण्याचे टाळले. दरम्यान, पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोहिते पाटील हे दोन दिवसात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, अशी घोषणा केली. मात्र मोहिते पाटील यांच्या उमेदवारीचा निर्णय पवार यांनी गुलदस्त्यातच ठेवला. आता मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा नेमकी केव्हा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT