पुणे

उपोषणास सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा

CD

पारगाव, ता. २४ : धामणी परिसरातील उपसा सिंचन योनांच्या शेती पंपांना त्वरित वीज जोड द्यावे. या मागणीसाठी सोमवारपासून (ता. २२) माजी सरपंच सागर जाधव यांच्यासह २५ शेतकरी ग्रामपंचायतीसमोर उपोषणास बसले आहेत. उपोषण आज (ता.२४) तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी उपोषण स्थळी भेट दिली व पाठिंबा दिला. काहींनी शासन दरबारी आपल्या मागणी संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी व पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांनी नऊ गट स्थापन करून डिंभे कालव्यावरून एकूण सहा ते सात कोटी रुपये खर्च करून एकूण नऊ उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पाणी परवाना काढला. बँका आणि अन्य माध्यमातून कर्ज काढून प्रत्यक्ष जलवाहिनी देखील पूर्ण केली आहे. या कामाला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
शेतीपंपासाठी राज्य सरकारने सौर धोरण आणले आहे. मात्र, सौर पंपावरील उपसा सिंचन योजना ही पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यामुळे या परिसरातील उपसा सिंचन योजनेसाठी विशेष बाब म्हणून वीज जोड द्यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. काही महिलाही मंगळवारी (ता.२३) गावातील काही तास उपोषणास बसून पाठिंबा दिला.
दरम्यान, मागील तीन दिवसांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे, संदीप बाणखेले, किरण वाळुंज, प्रमोद बाणखेले, शिवसेना नेते रमेश येवले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, सचिन बांगर, प्रवीण थोरात, किरण ढोबळे, निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे पाटील, बाबाजी चासकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली. महावितरणचे कार्यकारी अभियंता राहूल गवारे, तहसीलदार सचिन वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनीही उपोषणस्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT