Red Eye sakal
पुणे

Eye Treatment : लाल होणाऱ्या डोळ्यांचे निदान करा लवकर; नेत्रतज्ज्ञांचा राष्ट्रीय परिषदेत सल्ला

तुमचे वय साठीपर्यंत असेल आणि डोळे सतत लाल होत असतील किंवा ते दुखत असतील तर तुम्हाला डोळ्यांचा दुर्मीळ ‘युव्हिटीस’ आजार असण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तुमचे वय साठीपर्यंत असेल आणि डोळे सतत लाल होत असतील किंवा ते दुखत असतील तर तुम्हाला डोळ्यांचा दुर्मीळ ‘युव्हिटीस’ आजार असण्याची शक्यता आहे. या आजाराबद्दल सामान्य नागरिकांबरोबरच वैद्यकीय आणि नेत्रतज्ज्ञ यांच्यामध्ये जागृती करणे ही काळाची गरज आहे, असे राष्ट्रीय पातळीवरील नेत्रतज्ज्ञांनी रविवारी स्पष्ट केले.

‘पुणे नेत्रतज्ज्ञ संघटना’ (पीओएस) आणि ‘राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्था’ (एनआयओ) यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत चेन्नई येथील शंकर नेत्रालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. पार्थोप्रतिम दत्ता मुजुमदार आणि चंदीगड येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रा. रिमा बन्सल यांनी ही माहिती दिली. या वेळी ‘एनआयओ’चे नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर आणि ‘पीओएस’चे अध्यक्ष डॉ. मंदार परांजपे उपस्थित होते.

युव्हिटीस म्हणजे काय?

  • डोळ्याचा पांढरा भाग (श्वेत पटल), आतील पाणी आणि डोळ्यांतील मागील पटल (रेटिना) हे भाग या नेत्रविकारात सर्वाधिक प्रभावित होतात.

  • युव्हिटीस हा दुर्मीळ नेत्रविकार आहे. डोळा लाल होणे, दुखणे, दृष्टी अधू होणे ही युव्हिटीसची लक्षणे असू शकतात.

  • आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती डोळ्यातील आपल्याच निरोगी पेशींवर हल्ला चढवते. त्या पेशींना नष्ट करू लागते. त्या वेळी युव्हिटीस होण्याची शक्यता वाढते.

  • आपल्या डोळ्यांत झालेल्या जंतुसंसर्गाविरोधात शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती लढत असते. त्यावेळीदेखील हा नेत्रविकार रुग्णाला होऊ शकतो.

  • डोळ्यांच्या वेगवेगळ्या भागात जंतुसंसर्गानुसार युव्हिटीसचे विविध प्रकार पडतात.

रोगनिदानातील आव्हान

युव्हिटीस नेत्रविकाराची लक्षणे ही सामान्य आहेत. त्यामुळे नेमका कोणता नेत्रविकार झाला, याचे मोठे आव्हान रोगनिदान करताना नेत्रतज्ज्ञांपुढे असते. त्यासाठी विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. त्यातून त्याचे अचूक निदान करता येते. मात्र या आजाराबाबत लोकांना फारशी माहिती नाही. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांमध्येही जागृतीचा अभाव आहे. त्यामुळे याचे लवकर निदान करणे, हे मोठे आव्हान सध्याच्या काळात आहे. त्यासाठी या आजाराबद्दल जनजागृती हा एकच प्रभावी मार्ग आहे. अशी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना नेत्रतज्ज्ञांकडे जाऊन सखोल तपासणी करण्याची गरज आहे.

हा दुर्मीळ नेत्रविकार २० ते ६० वर्षे वयोगटातील लोकसंख्येत प्रकर्षाने दिसून येतो. त्यातही तरुणांची संख्या सर्वाधिक दिसते. या विकाराचे उपचार दीर्घकालीन आणि खर्चिक असल्याने काही रुग्ण अर्धवट उपचार सोडण्याची भीती असते.

- डॉ. पार्थोप्रतिम दत्ता मुजुमदार, शंकर नेत्रालय, चेन्नई

यापूर्वी या नेत्रविकाराचे फारसे निदान होत नव्हते. आता आधुनिक तंत्रज्ञान आणि या विकाराबाबत नेत्रतज्ज्ञांमध्ये होणारी जागृती यामुळे याचे निदान आता वाढत आहे. लवकर निदान आणि प्रभावी उपचारासाठी राष्ट्रीय पातळीवर संशोधन सुरू असून, त्यातून आशादायक निष्कर्ष पुढे येत आहेत.

- डॉ. प्रा. रिमा बन्सल, पीजीआयएमई, चंडीगड

लक्षणे कोणती?

  • डोळ्यांत जळजळ

  • डोळे सतत लाल होणे

  • दुखणे

  • दृष्टी कमी होणे

  • प्रकाशामुळे त्रास होणे

धोका कोणता?

  • वेळेत अचूक रोगनिदान आणि प्रभावी उपचार न केल्यास रुग्णाची दृष्टी कायमस्वरूपी जाण्याचा धोका

  • एकाच वेळी रुग्णाच्या दोन्ही डोळ्यांना याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे दृष्टीवर दुष्परिणाम होतो.

उपचार

  • उपचार दीर्घकालीन असतात

  • काही रुग्णांना आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात

  • डोळ्यांत इंजेक्शनची गरज लागू शकते

  • काही औषध दीर्घ काळ डोळ्यात टाकण्याचा सल्ला दिला जातो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident Video: पुण्यात बसचा थरार! चालक उतरला अन् बस चालू लागली; चालत्या गाडीतून प्रवाशांच्या उड्या

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT