पुणे

यंदाचे डिपेक्स २०२६ च्या कल्पना सादरीकरण राऊंडचे प्रायोजकत्व कर्मयोगी इन्स्टिट्यूटकडे

CD

यंदाचे डिपेक्स कल्पना सादरीकरण
राऊंडचे प्रायोजकत्व ‘कर्मयोगी’कडे
........
पंढरपूर, ता. १ : येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या सामाजिक नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी डिपेक्स २०२६ चे कल्पना सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही विभागस्तरीय स्पर्धा बुधवारी (ता. ४) पंढरपूर येथे पार पडणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली
या स्पर्धेची संकल्पना ‘ग्रामीण विकासासाठी सामाजिक नवोपक्रम’ अशी असून, ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणासाठी नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेत पदविका, पदवी व आयटीआयचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये अंदाजे २०० प्रकल्प आणि सुमारे १००० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभिनव कल्पना सादर करून ग्रामीण भागातील समस्या व त्यावरील उपाय मांडण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी ५ ते ८ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. डिपेक्स २०२६ या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि उद्योजकतेला चालना मिळेल असा विश्वास डिपेक्स २०२६ चे महाविद्यालयाचे संयोजक डॉ. अभय उत्पात यांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर स्टॅन्डपासून बसची सोय केली आहे. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डिपेक्स २०२६ ही स्पर्धा सृजन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सौजन्याने आयोजित करण्यात येत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: १४ किमी सायकल प्रवास ते चेन्नईकडून पदार्पण! शिक्षामित्र असलेल्या बापाच्या लेकाचा IPL प्रवास सुरू, कोण आहे प्रशांत वीर?

सुनील तावडे यांच्या लेकीने घेतलेला लग्नाआधीच सासरी राहण्याचा निर्णय; 'हे' होतं कारण, म्हणाले- तिची सासू...

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

SCROLL FOR NEXT