उरुळी कांचन : कदमवाकवस्ती हद्दीत पुणे - सोलापूर महामार्गालगत रिक्षा चालक आणि एसटी बस चालक यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून एसटी बस चालकाने रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना सोमवारी (ता. २७) सकाळी अकराच्या सुमारास एचपी कंपनी समोर घडली.
हसन शमशेर पठाण (वय ४०, रा. इनामदारवस्ती, बाजार मळा रोड, लोणी काळभोर ता. हवेली) असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. योगेश सिद्धेश्वर खडके (रा. भांडगाव, ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २७) सकाळी अकराच्या सुमारास रिक्षा चालक हसन शमशेर पठाण हे रिक्षा (एम.एच. १२ व्ही. बी. ५०८७) मधून भाडे घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या एसटी बस (एम.एच. १४ बी.टी. २८१९) ची धडक बसली.
पठाण यांनी एसटी बस चालक खड़के यास 'गाडी हळु चालवता येत नाही का? माझ्या रिक्षाला धडक का दिली? अशी विचारणा केली असता 'तुलाच गाडी निट चालविता येत नाही का? तू काय भाई आहे का मला गाडी चालवायला शिकवतो?
असे म्हणून रिक्षा चालक पठाण यांना जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. एसटी चालक खडके याने एसटी मधील दगड रिक्षा चालक पठाण यांच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.