पुणे

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशात आणि परदेशात उच्च शिक्षणाच्या अवकाशात विहार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘सकाळ इंडिया फाऊंडेशन’ने शिष्यवृत्तीच्या रूपाने बळ दिले. ही शिष्यवृत्ती केवळ मदत नव्हे; तर आत्मसन्मान आणि आत्मविश्‍वास वाढविणारी शाबासकीची थाप आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या आणि देशातही उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा या उपक्रमाचे साठावे वर्ष आहे. या वर्षी ५२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संचालिका मृणाल पवार, फाउंडेशनचे कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब जाधव, रमेश बोडके, सचिव डॉ. अ. श्री. कालगावकर या वेळी उपस्थित होते.

पुढील वर्षी शिष्यवृत्तीची रक्कम एक लाख रुपये करण्याचा मानस व्यक्त करीत प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारखे अनेक तंत्रज्ञान आले आहे. यामुळे उद्योगांवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ती निराधार ठरविली पाहिजे. त्यातून अनेक नवे रोजगार निर्माण होतील. तशा संधी शोधण्याची गरज आहे. भारतातही तुम्हा तरुणांसाठी अनेक संधी आहेत. त्यामुळे परदेशात जाऊन शिक्षण घ्या; पण परत येऊन आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल करा.’’

जाधव म्हणाले, ‘‘पूर्वी आपल्या देशात महाविद्यालयात जाणे म्हणजे मोठी गोष्ट समजली जायची. आता परिस्थिती बदलली आहे. तुम्ही शिक्षणासाठी परदेशात जात आहात, परदेशी चालला असला, तरी देशाला विसरू नका. तेथे जाऊन ज्ञान मिळवा आणि त्याचा वापर देशासाठी करा.’’ डॉ. कालगावकर म्हणाले,‘‘फाऊंडेशनचे यंदा हिरकमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त शिष्यवृत्ती प्रत्येकी ७५ हजार रुपये दिली आहे. पुढील काळात ही रक्कम वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल.’’

परदेशात शिक्षणासाठी जायचे म्हटले की पैशांची गरज असतेच. त्याला सकाळ इंडिया फाऊंडेशनने हातभार लावला आहे. पण रकमेपेक्षा ही शिष्यवृत्ती खूप प्रतिष्ठेचीदेखील आहे. यामुळे आत्मविश्‍वास वाढला आहे. यातून परदेशात गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नक्कीच बळ मिळेल.
- मौलिक कामदार, शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी

मुलाला परदेशात जाण्यासाठी सकाळ इंडिया फाऊंडेशनने शिष्यवृत्ती दिल्याने आमचा भार थोडा हलका झाला आहे. गरज असताना जवळच्या व्यक्तीकडून मोलाची मदत मिळाल्याची भावना पालक म्हणून मनात आहे.
- पूजा कुलकर्णी, शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्याचे पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT