Development Sakal
पुणे

जिल्हा वार्षिक विकास आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासासाठीच्या आगामी आर्थिक वर्षाच्या (२०२२-२३) ७९३ कोटी ८६ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक विकास आराखड्याला शुक्रवारी (ता.१०) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या विकास आराखड्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांसाठी ६१९ कोटी १० लाख रुपये, अनुसूचित जाती योजनेंतर्गत विकासकामांसाठी १२८ कोटी ९३ लाख रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४५ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आदी उपस्थित होते.

सर्वसाधारण योजनेअंतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी ५४ कोटी १८ लाख रुपये, ग्रामीण विकासासाठी ८० कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी ३३ कोटी सहा लाख, ऊर्जा विकासासाठी ५१ कोटी १९ लाख उद्योग व खाणकामासाठी १ कोटी १७ लाख, परिवहनसाठी ११३ कोटी, सामान्य आर्थिक सेवांसाठी १६ कोटी २८ लाख, सामाजिक सामुहिक सेवांसाठी २१० कोटी ५६ लाख, सामान्य सेवांसाठी २८ कोटी ६९ लाख आणि नावीन्यपूर्ण योजनांसाठी ३० कोटी ९५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.अनुसूचित जाती योजनेअंतर्गत कृषी व संलग्न सेवेसाठी ४ कोटी ४० लाख, ऊर्जा विकास - ७ कोटी, उद्योग व खाणकाम - ३४ लाख, परिवहन- ३० कोटी, सामाजिक सामुहिक सेवा - ८३ कोटी ३१ लाख आणि आणि नावीन्यपूर्ण योजनांसाठी ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.आदिवासी उपयोजनेअंतर्गत कृषी व संलग्न सेवेसाठी ६ कोटी २७ लाख, ग्रामीण विकास - ४ कोटी ८५ लाख, पाटबंधारे व पूर नियंत्रण - ३ कोटी ४० लाख, ऊर्जा विकास - २ कोटी ९६ लाख, उद्योग व खाणकाम - तीन लाख, परिवहन - ६ कोटी ४२ लाख, सामाजिक सामुहिक सेवा - २० कोटी ७५ लाख आणि नावीन्यपूर्ण योजनांसाठी १ कोटी १५ लाख रुपये प्रस्तावित केले आहेत.

‘डोंगरी विकासां’तर्गत कामांना मंजुरी

दरम्यान, डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डोंगरी विकासकामे आढावा बैठकीत ही मंजुरी दिली. या बैठकीला आमदार महादेव जानकर, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, राहुल कूल, माधुरी मिसाळ, संजय जगताप, सुनील शेळके, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, अतुल बेनके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT