पुणे

सोलापूर- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पंढरपुरात होणार

CD

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पंढरपुरात होणार
-------------
आषाढी वारी तयारीचा आढावा घेतला जाणार
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्याचे नियोजन केले आहे. यंदाची जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोलापूरऐवजी थेट पंढरपूर येथे आयोजित केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येत आहे.

आषाढी वारीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या तयारीचा आणि प्रशासनाने केलेल्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सर्व सदस्य पालखी मार्गावरील गावांना भेटी देणार आहेत. यादरम्यान विकासकामे, वारकऱ्यांच्या मुक्कामाची ठिकाणे आणि सोयी-सुविधांची पाहणी केली जाईल. या पाहणी दौऱ्यानंतर पंढरपुरातच सर्वसाधारण सभा पार पडणार असल्याचे सूत्रांकडून समजते. सामान्य प्रशासन विभागाकडून सर्वसाधारण सभेची तारीख, वेळ आणि ठिकाण मंजुरीसाठी अध्यक्षांकडे पाठविण्यात आले आहे. साधारण ही सभा ३० जून रोजी होण्याची शक्यता आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रशासक काळानंतर जिल्हा परिषदेत लोकनियुक्त पदाधिकारी रुजू झाले आहेत. यापूर्वीची पहिली सभा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी झाली होती, तर दुसरी सभा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना प्रशासनाच्या कामकाजाची ओळख करून देण्यात गेली होती. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजाच्या दृष्टीने आणि वारीच्या नियोजनासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

------पूर्ण-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT