sandip patil 
पुणे

सिंघमची डरकाळी, ""स्वतःला नेते म्हणताय, तर या पुढे... ''  

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : ""लॉकडाउन शिथिलतेच्या काळात नागरिक व प्रशासन यांना सहकार्य करण्यासाठी स्वतःला नेते म्हणविणाऱ्यांनी पुढे आले पाहिजे,'' असे मत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले. 

जुन्नर येथे रमजानच्या निमित्ताने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत संदीप पाटील बोलत होते. सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी विकास दांगट, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, पोलीस व महसूल अधिकारी व हिंदू मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ""लॉकडाउन शिथिल केला म्हणजे कोरोना गेला, असे कोणी समजू नये; उलट आता तुम्ही कामासाठी बाहेर पडत असल्याने अधिक सतर्क राहिले पाहिजे. कोरोना कोणाच्याही माध्यमातून येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवू नका. सोशल डिस्टंन्सींगचे पालन करा. सॅनिटायझर मास्कचा वापर करा व कोरोनाला दूर ठेवा. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास परिसरातील नागरिकांनी माहिती देण्यास पुढे यावे. लक्षणे आढळून आल्यास तपासणी करून घ्यावी.'' 

प्रांताधिकारी डुडी, नगराध्यक्ष श्‍याम पांडे, नगरसेवक जमीर कागदी, म. पां. काजळे यांनी आपल्या सूचना मांडल्या. पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी प्रास्तविक; तर विलास कडलग यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली खन्ना यांनी आभार मानले. 

जुन्नर- आंबेगाव तालुक्‍यात सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या चेक पोस्ट पॅटर्न जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 
- संदीप पाटील, 
पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT