Court
Court 
पुणे

घटस्फोट न घेतल्यास दुसरे लग्न रद्द ठरणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - घरच्यांनी तिच्या मनाविरोधात तिचे लग्न लावून दिले. मात्र लग्नाच्या काही महिन्यांनतर तिने फेसबुकवरील एका मित्राशी प्रेमविवाह केला. पण आधीच्या पतीबरोबर घटस्फोट न घेता केलेले दुसरे लग्न न्यायालयाने रद्द ठरवत तिला दणका दिला.

कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांनी हा निकाल दिला. विशेष म्हणजे पहिले लग्न लपवून तिच्या आई-वडिलांनीच धुमधडाक्‍यात तिचे दुसरे लग्न लावून दिले होते. या बाबत सविस्तर माहिती अशी, की रेखा आणि सुभाष (नावे बदललेली) यांचे डिसेंबर २०१७ मध्ये लग्न झाले. मात्र रेखा हिने तिचे आधी झालेले लग्न सुभाषपासून लपवले होते. रेखाचे तिच्या कुटुंबीयांनी आधी अरेंज मॅरेज केले होते. लग्नानंतर काही महिन्यांनंतर तिची सुभाषशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये लग्न केले. मात्र याची रेखाच्या पहिल्या पतीला कल्पना नव्हती. त्याला ही सर्व माहिती मिळाल्यानंतर त्याने थेट सुभाषला गाठले आणि सर्व प्रकार सांगितला. आईला भेटायच्या नावाखाली रेखा दोन ते तीन आठवडे पुण्यात सुभाषकडे राहत होती. या बाबत सुभाषने रेखाच्या कुटुंबीयांना जाब विचारला असता त्यांला मारहाण करण्यात आली. या बाबत त्याने पोलिसांत तक्रारदेखील दिली आहे. तसेच रेखाला नांदवावे यासाठी सुभाषला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सुभाषने कौटुंबिक न्यायालयात हे लग्न रद्द करण्यासाठी दावा दाखल केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT