अण्णा द्रमुकमधील
बंडखोर ‘टीव्हीके’मागे
विजय यांना पाठिंबा; दुफळी चव्हाट्यावर
चेन्नई, ता. १२ (पीटीआय) : तमिळनाडूत अण्णाद्रमुक पक्षामध्ये फूट पडण्याची चिन्हे मंगळवारी स्पष्ट दिसू लागली आहेत. पक्षाचे प्रमुख के. पलानीस्वामी यांच्याविरोधात आमदारांच्या एका गटाने बंड पुकारत त्यांच्यावर कट्टर प्रतिस्पर्धी द्रमुकसोबत युती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला असून आणि बुधवारी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, विजय यांनी बंडखोर नेते एस. पी. वेलुमणी आणि सी. वे. षण्मुगम यांची भेट घेतली.
वेलुमणी आणि षण्मुगम यांच्या नेतृत्वाखालील सुमारे ३० आमदार बंडखोर गटात असल्याचे मानले जात आहे. २३ एप्रिलच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने लढवलेल्या १६४ जागांपैकी केवळ ४७ जागा जिंकल्यानंतर पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर या गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पत्रकारांशी बोलताना षण्मुगम यांनी सांगितले की, सरकारला पाठिंबा देणारे पत्र देण्यासाठी ते विजय यांची भेट घेणार आहेत. तसेच पक्षाचे सरचिटणीस के. पलानीस्वामी हे द्रमुकच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करू इच्छित होते. ‘‘अण्णाद्रमुकची स्थापना द्रमुकला विरोध करण्यासाठी आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी झाली होती, असे असल्यामुळे एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याच्या पलानीस्वामी यांच्या प्रस्तावाला सर्व पक्षसदस्यांनी विरोध केला. असा कोणताही प्रस्ताव अण्णाद्रमुकच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. ‘‘अण्णाद्रमुकला नव संजीवनी मिळण्याची गरज असून ‘अम्मा (जयललिता) राज’ परत यायला हवे, त्यामुळे टीव्हीकेला पाठिंबा द्यायला हवा’ असेही षण्मुगम म्हणाले. मात्र, अण्णाद्रमुक प्रमुखांनी हे आरोप अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये अण्णाद्रमुकने वेलुमणी, षण्मुगम आणि सी. विजयभास्कर हे टीव्हीके सरकारमध्ये मंत्रिपदे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पक्षाने केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.