पुणे

ज्ञानेश सावंत, दत्ता देशमुख यांना ‘डॉ. परुळेकर पुरस्कार’

सकाळवृत्तसेवा

शंकर टेमघरे यांना विशेष पुरस्कार
पुणे - ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीमधील बातमीदार ज्ञानेश सावंत आणि औरंगाबाद आवृत्तीमधील बातमीदार दत्ता देशमुख यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तर पत्रकारिता आणि समाजाला जोडणारे विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पुणे विभागातून उपसंपादक शंकर टेमघरे यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. 

विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या ‘सकाळ’च्या बातमीदारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो. ‘सकाळ’चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. २०) मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात प्रमुख पाहुणे डॉ. भारत वाटवानी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. 

महापालिकेच्या विविध विषयांवर विस्तृत वार्तांकन करताना ‘ती’च्या कळा’ ही सावंत यांची वृत्तमालिका गाजली. केरळमधील पूरपरिस्थितीचे त्यांचे वार्तांकनही उल्लेखनीय झाले होते. औरंगबाद आवृत्ती अंतर्गत बीडमध्ये बातमीदार म्हणून काम करणारे देशमुख यांनी महिला व बालविकास विभागातील अनुदान गैरव्यवहार प्रकरण धसास लावले. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्याला काम करताना आलेले अपंगत्त्व, या विषयाबद्दलचे त्यांचे वार्तांकन गाजले. गेल्या १६ वर्षांपासून पालखी सोहळ्याचे वार्तांकन टेमघरे यांनी केले आहे. त्या दरम्यान ई-सकाळसाठी ई-वारी, साम टीव्हीसाठी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, सकाळ सोशल फाउंडेशनसाठी ‘जाऊ देवाचिया गावा’, ‘साथ चल’ आदी उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT