teacher 
पुणे

शिक्षकांना 'कोरोना ड्यूटी'ची सक्ती नको : टॅफनॅप संघटनेची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे -  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये शासकीय सेवेत असणाऱ्या  अनेक शिक्षकांना सक्तीने सहभागी करून घेतले आहे. कोरोनाविरोधातील लढयात शिक्षकांचा सहभाग हा सक्तीचा न ठेवता ऐच्छिक असावा, अशी मागणी टीचर्स असोसिएशन फॉर नॉन-एडेड पॉलिटेक्निक्स (टॅफनॅप) ने राज्य सरकारतर्फे केली आहे. तसेच शासकीय सेवेतील शिक्षकांना कोरोना ड्यूटीची सक्ती कायम ठेवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही 'टॅफनॅप'तर्फे देण्यात आला आहे.

असोसिएशनने आपल्या मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. यात  महिला शिक्षक, पन्नास वर्षापुढील शिक्षक, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा व्याधीग्रस्त शिक्षकांना कोरोनासंबंधी ड्यूटी देऊ नये, शिक्षकांना कोरोनासंबंधी ड्यूटी दिलेल्या शिक्षकांचा ५० लाख रुपयांचा आयुर्विमा आणि १० लाख रुपयांचा आरोग्य विमा शासनाने काढावा, कोरोनासंबंधी ड्यूटीमध्ये सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण व पीपीई किट, मास्क, फेसशील्ड, ग्लोज अशी संरक्षणाची साधने द्यावीत, अशा मागण्यां संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'टॅफनॅप'ने शासनाकडे केलेल्या मागण्या 
- कोरोनासंबंधी ड्यूटीमध्ये सहभागी झालेले शिक्षक किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही कोरोनाबाधित झाल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन बेड राखीव ठेवावा आणि सर्व उपचार खर्च शासनाने करावा.
- कोरोनासंबंधी ड्यूटीमध्ये सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांच्या कार्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये करून वेतनवाढ द्यावी.
- शिक्षकांना अशैक्षणिक कामे करायला लागू नयेत,  म्हणून कायमस्वरूपी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी.
- कोरोना ड्यूटी चा काळ विशेष सेवा काळ म्हणून गृहीत धरून शिक्षकांना विशेष रजा मंजूर करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT