junnar
junnar 
पुणे

जुन्नरला डॉक्टर पतीपत्नीचा अभिनव प्रयोग, पाण्यात केली प्रसूती

दत्ता म्हसकर

जुन्नर - जुन्नरला डॉक्टर पतीपत्नीने आपल्या हॉस्पिटलमध्ये पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर पाण्यामध्ये यशस्वी बाळंतपण केले आहे.  

शस्रक्रियेविना बाळंतपणासाठी या पद्धतीचा वैद्यकीय क्षेत्रात वापर केला जात असून, या आधुनिक पध्दतीमुळे मातेला बाळंतपणा दरम्यान होणारा त्रास फारसा जाणवत नसल्याचे डॉ. प्रसाद व मोनाली शिंगोटे यांनी सांगितले. 

मातृत्व हे स्त्रीच्या आयुष्यातील एक परमसुख आहे. परंतु, ते अनुभवण्यासाठी तिला अतिशय कठीण अशा त्रासातून जावे लागते. बाळंतपणाच्या कळा गंभीर व खूप त्रासदायक असतात. त्यामुळे स्त्रीचा पुनर्जन्म होतो असे म्हटले जाते. अनेकदा शस्रक्रियेचा मार्ग अवलंबून बाळंतपण सुसह्य केले जाते मात्र कोमट पाण्यात डिलिव्हरी केल्याने मातेच्या निम्म्या कळा कमी होतात बाळंतपणाचा मार्ग सॉफ्ट होतो हार्मोनल बदल होतात. सर्व मांस पेशी रिलँक्स होतात त्यामुळे माता कळा व्यवस्थितपणे जास्त वेळ घेवू शकते.

डॉ. प्रसाद व डॉ. मोनाली शिंगोटे यांनी जुन्नर येथील त्यांच्या हॉस्पिटल व सोनोग्राफी सेंटरमध्ये ग्रामीण भागातील अशा प्रकारचे बाळंतपण प्रथमच केले असल्याचा दावा केला आहे. माता श्रध्दा सुजित लांडे व बाळ दोघेही सुखरूप असल्याचे डॉ शिंगोटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT