Daund-Junction
Daund-Junction 
पुणे

मेल, एक्स्प्रेसमध्ये कोरोना होत नाही का?

सकाळवृत्तसेवा

रेल्वे प्रवाशांचा सवाल; दौंडला नऊ महिन्यांपासून डीएमयू, शटल बंद
दौंड - कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण देत रेल्वे प्रशासनाने मागील नऊ महिन्यांपासून दौंड-पुणे-दौंड डिझेल मल्टिपल युनिट (डीएमयू), शटल व पॅसेंजर सेवा बंद ठेवल्या. मात्र, दुसरीकडे लांब पल्ल्याच्या मेल व एक्‍स्प्रेस गाड्या पूर्ण क्षमतेने धावत असल्याने या गाड्यांमधील प्रवाशांना कोरोनाचा धोका नाही का, असा प्रश्न दैनंदिन प्रवासी विचारत आहेत. 

शटल, डीएमयू व पॅसेंजर सेवा बंद असल्याने २२ मार्चपासून दौंड, हवेली, बारामती, शिरूर व श्रीगोंदा तालुक्‍यातून पुण्याकडे जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या दौंड-पुणे लोहमार्गाचे अंतर ७५ किलोमीटरचे आहे. दौंड-पुणे दरम्यान, पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी व हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे आणि पुण्यातून लोकल मार्गे पिंपरी ते लोणावळापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनलॉक प्रक्रिया अंतर्गत आठ महिन्यानंतर लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या ‘विशेष’ या गोंडस नावाने सुरू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने दौंड ऐवजी सोनवडी कॉर्ड लाइनमार्गे धावत आहेत. 

प्रशासनाने दैनंदिन प्रवाशांसंबंधी उघड भेदभाव केल्याने दौंड -पुणे- दौंड गाड्यांद्वारे पुणे व नगर जिल्ह्यातून पुण्याला जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि छोटे व्यापारी गेली नऊ महिने घरी बसून आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष...
कोरोनाचा धोका टळलेला नाही तरी नोकरी टिकविणे आणि उदरनिर्वाहा- करिता दैनंदिन सेवा सुरू होण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक प्रवाशाला आपल्या जिवाची काळजी असल्याने रेल्वे सेवा सुरू केल्यास शारीरिक अंतराचे पालन करण्यासह तोंडाला मास्क घातला जाईल, अशी ग्वाही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दौंड ते पुणे दरम्यान एसटी सेवा सुरू आहे; पण रेल्वे मासिक व त्रैमासिक पासच्या तुलनेत ती खर्चिक आणि जास्त वेळ घेणारी आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : पवईत ४ कोटी ७० लाखांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT