pune.jpg
pune.jpg 
पुणे

सणसरमध्ये रंगल्या कुत्र्यांच्या शर्यती ; सात सेकंदात 200 मीटर पार

सकाळ वृत्तसेवा

भवानीनगर(पुणे) : घोड्यांच्या शर्यती परवडत नाहीत आणि बैलाच्या शर्यतीवर बंदी आहे. पण म्हणून काय झाले? हौसेला मोल नाही आणि शौकिनांना अडवेल अशी वाट नाही. आता कुत्र्यांच्या शर्यती लक्ष वेधून घेऊ लागल्या आहेत. इंदापूरनंतर सणसरमध्ये जातीवंत कुत्र्यांच्या शर्यती झाल्या, ज्यामध्ये राज्यभरातून कुत्री सहभागी झाली होती.

सणसर येथे नितीन काटकर व शिवशंभू प्रतिष्ठान यांनी श्वान स्पर्धा आयोजित केल्या. या स्पर्धेत पुण्यासह उस्मानाबाद, सोलापूर, मुंबई, सातारा, ठाणे, नगर जिल्ह्यांतून ग्रेहाऊंड जातीची कुत्री सहभागी झाली होती. या स्पर्धेला आमदार दत्तात्रेय भरणे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक रणजित निंबाळकर यांनीही भेट देऊन माहिती घेतली. पंधरा हजार आणि चांदीची गदा व अशीच काही पारितोषिके या स्पर्धेसाठी ठेवली होती. 

सात सेकंदात 200 मीटर 
या स्पर्धेत सहभागी कुत्र्यांनी अगदी 7 सेकंदात 200 मीटरपर्यंतचे अंतर पार करीत शर्यती जिंकल्या. तारेला अडकवलेल्या रिंगला बाहुला बांधून त्याची दोरी जिथे शर्यत संपते, त्या मशीनला अडकवली होती. जिथून कुत्र्यांची शर्यत सुरू होणार होती, तिथे पंचांनी मास्क बांधलेल्या कुत्र्यांना बाहुला दाखवायचा. मशीनवर बसलेल्या ऑपेरटरकडे हातवारे करून बाहुला जमीनीवर आपटला की, इकडे मशीन सुरू होऊन दोरा गुंडाळायला सुरवात होते, तो जेवढ्या वेगात असतो, तेवढ्या वेगात कुत्री बाहुल्याला पकडण्यासाठी धावतात अशी ही स्पर्धा असते. अर्थात या धावणाऱ्या कुत्र्यांच्या किमतीही लाखो रुपयांच्या आहेत आणि त्यांचा खुराक, त्यांची निगा याची माहिती ऐकून सणसरकरांनी तोंडात बोटे घातली. 

समालोचकाने लक्ष वेधून घेतले 
आतापर्यंत कुस्ती, बैलगाडा शर्यतीचे समालोचन खास समालोचकांकडून ऐकायला छान वाटायचे. मात्र, कुत्र्यांच्या शर्यतीचेही अनोख्या ढंगात समालोचन केले जाते. सातारा येथील प्रकाश म्हागावकर गेली तेरा वर्षे कुत्र्यांच्या स्पर्धेचे समालोचन करतात. "आता दुसरा फेरा...उस्मानाबादची लालपरी विरुद्ध साताऱ्याचा ब्लॅक डायमंड...ताण घेतलाय...मास्कवरूनच दिसतेय' असं एकदम वेगाने शब्दांची फेक करणाऱ्या म्हागावकर यांनीही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. 

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT