Sudhir Farate and Ashok Pawar
Sudhir Farate and Ashok Pawar Sakal
पुणे

शिरूर : शेतकरी समाजाशी निगडीत संस्थेत आम्हाला राजकारण आणायचे नाही

नितीन बारवकर

शिरूर - तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. २९) होत असताना कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी (सन २०२०२ - २१) सादर केलेल्या वार्षिक अहवालावर भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने अनेक आक्षेप घेतले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे व शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी आज पत्रकार परिषदेत कारखान्याचे अध्यक्ष, आमदार ॲड. अशोक पवार यांना अनेक सवाल केले.

शेतकरी समाजाशी निगडीत संस्थेत आम्हाला राजकारण आणायचे नाही. परंतू ही संस्था जगली पाहिजे यासाठी आमचा लढा आहे. कारखान्याच्या अधोगतीला अध्यक्ष पवार हेच जबाबदार असल्याने त्यांनी एकेकाळी चांगला बाजारभाव देणारा आपला कारखाना आताच अडचणीत कसा आला, याचा सभासदांसमोर जाहीर खुलासा करावा, अशी मागणी दादा पाटील व सुधीर फराटे यांनी यावेळी केली. घोडगंगा चे माजी संचालक ॲड. सुरेश पलांडे व आत्माराम फराटे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, शिरूर बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, भाजपचे शिरूर शहर अध्यक्ष नितीन पाचर्णे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष काका खळदकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे, विभाग प्रमुख विरेंद्र शेलार आदी यावेळी उपस्थित होते.

कारखाना वाचविण्यासाठी आम्ही राजकारणविरहीत लढा उभा केला असून, यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कारखान्यातील काही संचालकही आमच्या या विचाराच्या पाठिशी आहेत, असा दावा दादा पाटील फराटे यांनी केला. ते म्हणाले, "कारखान्याबाबत अनेक विषय आम्ही प्रशासनाकडे देतो. परंतू त्याकडे डोळेझाक केली जाते. अध्यक्षांशी संबंधित खासगी साखर कारखाना उभा राहिल्यानंतरच ख-या अर्थाने घोडगंगा ची अधोगती सुरू झाली असून, सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून ही परिस्थिती वेळीच सावरली नाही तर शेतकरी प्रपंचाशी निगडीत ही संस्था मोडीत निघेल." मागील ऑनलाईन वार्षिक सभेत आम्ही मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता, 'म्यूट' करून आमचा आवाज बंद केला गेल्याचा आरोप त्यांनी केला. कारखान्यावर कर्ज कुणामुळे वाढले, कारखान्यावर अशोक पवार यांची एकहाती सत्ता असताना शेतक-यांना उसाला योग्य बाजारभाव मिळत नसेल तर याला जबाबदार कोण, कामगारांचे पगार कुणामुळे रखडलेत असे सवालही त्यांनी केले.

कारखान्याच्या अपयशाचे खापर अध्यक्ष पवार यांनी इतरांवर फोडू नये. ते स्वतः या स्थितीला जबाबदार आहेत. आमदार झाल्याने त्यांना कारखान्याच्या कामकाजास वेळ मिळत नाही. म्हणून त्यांनी स्वतःहून अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी मागणी पलांडे यांनी केली. शिरूर तालुक्यात खासगी कारखाना सुरू होण्यापूर्वी घोडगंगा ची चौफेर घोडदौड चालू होती. उस गाळप चांगले होत होते. उसाला रिकव्हरी रेट चांगला मिळत होता. कारखान्याला राज्य व देशपातळीवरील पुरस्कार मिळत होते. मग आताच ही परिस्थिती का बदलली, असा सवाल त्यांनी केला.

मॉडिफिकेशन व आधुनिकीकरणाच्या नावाखाली कारखान्याने कोट्यवधींचे कर्ज घेतले. मग गाळप व साखर उतारा वाढला पाहिजे. तो वाढला नसेल तर साखर उतारा चोरला जातोय हे स्पष्ट आहे, असा आरोप सुधीर फराटे यांनी केला. आमदारांनी विकासकामांचा भुलभलैय्या दाखवत कारखान्याकडून लक्ष इतरत्र वळविण्याचे काम चालविले आहे. त्यांच्या राजकारणासाठी सर्व निवडणूकांच्या खर्चाचा भार घोडगंगा वर टाकला जात आहे. त्यामुळेच शेतक-यांची ही संस्था मोडकळीस आली आहे. साखर उतारा चोरून मोठा गैरव्यवहार केला जात आहे, असे ते म्हणाले.

सभासद शेतक-यांना साधा एफआरपी देऊ न शकणा-या घोडगंगा च्या या कारभाराविरोधात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा काका खळदकर यांनी दिला.

घोडगंगा कारखान्याची ऑनलाईन सभा १५ दिवसांपूर्वीच जाहीर केली असून, सभासदांनी त्यांचे प्रश्न लेखी स्वरूपात कारखान्याकडे देण्याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार ज्यांचे प्रश्न वेळेत आणि नियमानूसार दाखल झालेले आहेत. त्या सर्व सभासदांना उत्तरे देण्यास मी बांधिल आहे. उद्या ऑनलाईन सभा असून त्यावेळी उसउत्पादक सभासदांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी आहे. पण शेतकरी हिताच्या संस्थेत कुणी राजकारण आणीत असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.

- ॲड. अशोक पवार आमदार तथा चेअरमन, रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT