डोर्लेवाडी (ता. बारामती) - येथील संत तुकाराम यात्रेबाबत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. 
पुणे

डोर्लेवाडीची तुकाराम बीज यात्रा व आठवडे बाजार बंद चा निर्णय

सोमनाथ भिले

डोर्लेवाडी - बारामती तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन डोर्लेवाडी येथे मंगळवार (ता.३०) रोजी होणारी संत तुकाराम महाराज बीजे निमित्तची यात्रा व गुरुवारचा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय संत तुकाराम महाराज देवस्थान समिती व ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला आहे. प्रति देहू समजल्या जाणाऱ्या डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५० हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात. गेल्यावर्षी यात्रा झाल्यानंतर काही दिवसातच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे येथील यात्रा ही शेवटची यात्रा ठरली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्यात कोरोनाची परिस्थिती भयंकर असल्याने बीजेचा उत्सव, यात्रा साजरी करणे उचित ठरणार याचा विचार करून व प्रशासनास सहकार्य करण्याच्या हेतूने येथील मंगळवारी होणारी यात्रा व गुरुवारचा आठवडे बाजार रद्द करण्याचा निर्णय संत तुकाराम महाराज देवस्थान समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. यावेळी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सरपंच बाळासाहेब सलवदे, देवस्थान समितीचे प्रमुख अशोक नवले, रमेश मोरे, तंटामुक्त अध्यक्ष मिलिंद भोपळे, पोलीस पाटील नवनाथ मदने, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ कालगावकर, दत्तात्रय काळोखे, दादा दळवी, संदीप नाळे, सचिन दळवी आदी उपस्थित होते. 

डोर्लेवाडी येथील संत तुकाराम महाराज बीज यात्रा दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरते. येथील यात्रेला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. कोरोना संसर्गाचा विचार करून प्रशासनाच्या सुचनेपुर्वीच देवस्थान समिती व ग्रामपंचायत यांनी यात्रा व आठवडे बाजार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे मी प्रशासनाच्या वतीने कौतुक करतो. बीजे दिवशी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. असे मत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी व्यक्त केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chakur Crime News: नवऱ्याच्या प्रेयसीला फसवण्यासाठी चुलतीकडून पुतण्याचा खून

Who is Danish Malewar? पदार्पणात २०० धावा करून ८१ वर्षांचा इतिहास बदलणाऱ्या विदर्भच्या पोट्ट्याचे MI कडून पदार्पण...

Premium|Study Room : आर्टेमिस २ च्या यशानंतर अवकाश स्पर्धेतील नव्या पर्वाची सुरवात!

IPS Officer Transfer : मोठी बातमी! पोलिस दलातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुण्यातील दोन पोलिस उपायुक्तांच्या बदल्या

Latest Marathi News Live Update: नेस्को ड्रग्सप्रकरणी ४ आरोपींना २३ तारखेपर्यंत कोठडी

SCROLL FOR NEXT