download-(1).jpg
download-(1).jpg 
पुणे

जांभे-नेऱ्हे रस्त्यावर दुहेरी खुन

रवींद्र जगधने

पिंपरी (पुणे) : उलटी आल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोटारीत दोघांनी शिरकाव करत महिलेचा गळा आवळून तर लहान बाळाचे तोंड दाबून खुन केला. तसेच एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. ९) रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान जांभे-नेऱ्हे रस्त्यादरम्यान घडली. आश्विनी दत्ता भोंडवे ( वय २५) व अनुज दत्ता भोंडवे (वय ८ महिने) असे मृतांची नावे आहेत. याबाबत दत्ता वसंत भोंडवे ( वय ३०, रा. दारूब्रे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ता हे मोटारीतून आपली पत्नी व मुलासह डांगे चौक येथून आपल्या गावी जात होते. त्यावेळी दत्ता यांना उलटी आल्याने बंगळूर-मुंबई महामार्गावर कोयते वस्तीला जोणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्यांनी मोटार थांबवली. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारीतील मागील सीटवर बसून अश्विनी यांचा ओढणीने गळा आवळला व गाडी जांभे गावच्या पुढे नेण्यास सांगितली. दरम्यान, दोन मोबाईल, सोनसाखळी, मंगळसुत्र व ५० हजारांची रोकड असा एक लाख तीस हजारांचा ऐवज आरोपींनी घेत अश्विनी यांचा ओढणीने गळा आवळून व बाळाचा रूमालाने तोंड दाबून खुन केला. मोटारी जांभे गावच्या पुढे नेऱ्हे गावाजवळ आल्यानंतर आरोपी मोटारी उतरून पळून गेले. असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT