Ambedkar Jayanti 2024  Sakal
पुणे

Ambedkar Jayanti 2024 : भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोसरीगावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीद्वारे तीन दिवशीय ३३वी व्याख्यानमाला घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

भोसरी – पंचशिल ध्वजारोहण...सामुदायिक बुद्धवंदना...फटाक्यांची आतषबाजीने उजळून निघालेले आसमंत...रात्री बाराच्या ठोक्याला घुमलेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’चा जयघोष...अबालवृद्धांचे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन...समाज प्रबोधनपर व्याख्याने...

महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबडकरांच्या प्रतिमेची वाजतगाजत काढलेली मिरवणूक...निळ्या झेड्यांनी व्यापून टाकलेले आकाश...अशा वातारणात भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोसरीगावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीद्वारे तीन दिवशीय ३३वी व्याख्यानमाला घेण्यात आली. गुरुवारी (ता. ११) क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अजित अभ्यंकर यांचे व्याख्याने झाले.

शुक्रवारी (ता. १२) प्रजापती सम्राट अशोक जयंतीनिमित्त यशवंत गोसावी यांचे व्याख्यान झाले. तर शनिवारी (ता. १३) डॉ. किरण मोघे यांचे व्याख्यान झाले. या वेळी माजी नगरसेवक अड. नितीन लांडगे, विजय फुगे, जालिंदर शिंदे,

रवि लांडगे, संतोष लोंढे, सागर गवळी, प्रियांका बारसे, संदीप राक्षे, बाळा धावडे, अमित धावडे, नंदू लांडे, आदिंनी जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी अमोल डोळस, भाऊसाहेब डोळस, दीपक डोळस,

चंद्रकांत डोळस, सखाराम डोळस, देविदास डोळस, राजेंद्र डोळस, समितीचे अध्यक्ष रोहित डोळस, महिला अध्यक्षा कविता डोळस, युवा अध्यक्षा चित्रा ओव्हाळ आदी उपस्थित होते. शनिवारी मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

रविवारी (ता. १४) सकाळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. दुपारी अन्नदान करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता भोसरी ते पिंपरीरीतील डॉ. आंबेडकर चौकापर्यंत दुचाकी रॅली काढून पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुळ्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. रात्री गायक राहुल साठे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम झाला.

रुग्णवाहिकेचे लोकार्पण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भोसरीतील संविधान चौकात घेतलेल्या कार्यक्रमात राहुल ओव्हाळ आणि रफिक कुरेशी यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी यावेळी राहुल ओव्हाळ,

रफिक कुरेशी, रेखा ओव्हाळ, चित्रा ओव्हाळ, दिलीप ओव्हाळ, मोसिन शहा, हरीश डोळस, निलेश मानकर, अमोल कविटकर, संतोष जठार, पंकज ओव्हाळ, शशिकांत ओव्हाळ आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना सरबताचे वाटप करण्यात आले.

कपिलवस्तु बुद्धविहार, दिघी

दिघीतील कपिलवस्तु बुद्धविहारात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

या वेळी माजी नगरसेवक विकास डोळस, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप परांडे, संजय गायकवाड, विनोद डोळस, रिषिकेश गायकवाड, रूपेश डोळस, अनिकेत भुलाडे, सचिन डोळस, संतोष निकाळजे,आदिंनी जयंतीनिमित्त नागरिकांना शुभच्छा दिल्या.

या वेळी अक्षय डोळस, योगेश माने, किरण डोळस, अमित डोळस, संदेश डोळस, सुबोध डोळस, रूणाल माने, प्रणय कदम, प्रणव म्हस्के, साहिल डोळस आदी उपस्थित होते.

धम्मनिनाद बुद्धविहार, इंद्रायणीनगर

आदर्श समाज विकास संघाद्वारे विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भोसरीतील एम. आय. डी .सी. पोलिस ठाण्याजवळील सर्कल मैदानात येथे 'ओळख संविधानाची' हा कार्यक्रम घेण्यात आला.

संविधान संवादिका शितल यशोधरा यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आदर्श समाज विकास संघातील -भाऊसाहेब डोळस, मुरलीधर गणविर, नामदेव वाळके, संतोष मोरे,विजय भालेराव, विशाल रोकडे, संदिप कदम, अरुण गायकवाड, दिपक पोहरे आदी उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता दुचाकी रॅली काढण्यात आली.

रॅलीचा समारोप धम्मनिनाद बुद्ध विहारात करण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक विलास मडगेरी, उद्योजक नानासाहेब राऊत, शिवराज लांडगे, डॉ. दत्ता शेटे, अभिमन्यू पवार आदिंनी जयंतीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

सायंकाळी महापुरुषांच्या प्रतिमेची मिरवणूक इंद्रायणी परिसरातून काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरनाथ तायडे, प्रसेनजीत वाळके, आयुष्य डोळस, करण तायडे, भुषण डोळस, आशुतोष कदम, अनुराधा काटे, कांचन गणविर, ज्योती डोळस, ताराबाई ओव्हाळ, सुरेखा वाळके, निलम भालेराव, साक्षी मोरे आदिंनी परिश्रम घेतले. धम्मनिनाद बुद्धविहार भूषण खंडारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळीतील काढलेली प्रतिमा लक्ष वेधून घेत होती.

स्वरांजली कला, क्रीडा मंच व सिद्धेश्वर हायस्कूल, भोसरी

भोसरीतील दिघी रस्त्यावरील सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वरांजली कला क्रीडा मंचचे संस्थापक प्रकाश डोळस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सुनील दोरवे, भावना भालेराव, रुपाली डोळस, संगीता पंडित यांचे व्याख्यान झाले.

या वेळी स्वरांजली क्रीडा महोत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ पवार, मल्हारी गवळी, गुणवंत नाखले, धम्मपाल गायकवाड, सचिन वाघ, दीपक क्षेत्रे आदी उपस्थित होते. स्वरांजली कला क्रीडा मंचद्वारे फटाक्यांची आतषबाजी करत डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

धम्मदूत मैत्री संघ, भोसरी

धम्मदुत मैत्री संघाच्या बुद्धविहारात धम्मचारी आर्यबल यांचे प्रवचन झाले. या वेळी राष्ट्रवी कॉंग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक सागर गवळी, सामाजिक कार्यकर्त्या कविता भोंगाळे, अमर फुगे आदिंनी शुभेच्छा दिल्या.

पंकेश डोळस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी भाऊराव गुडदे, विलास साळवे, संतोष शेलार, विजय सोनवणे, दिपाली तायडे, सुमन आंग्रे, दिपमाला वानखेडे, सुषमा सरदार, उषा शेलार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण गायकवाड यांनी केले. तर आभार राजू हिवराळे. यांनी मानले.

विक्रमशिला प्रबोधिनी, दिघी

दिघीतील विक्रमशिला प्रबोधिनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. येरवडा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर, महापारेषण उपकार्यकारी अभियंता प्रकाश सूर्यवंशी, डॉ. रोहिणी गायकवाड, गझलकार अशोक गायकवाड, लघुउद्योजक संजय भुजबळ आदिंनी व्याख्यान दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निखिल रोहीनीकर होते. या वेळी सांस्कृतीक कार्यक्रम झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण पुणेकर यांनी केले. सूत्रसंचालन रोशनकुमार गडलिंग व वैशाली गायकवाड यांनी केले. तर आभार मयूर गायकवाड यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

SCROLL FOR NEXT