Dr. manohar Chaskar sakal
पुणे

Manchar News : आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र डॉ. मनोहर चासकर यांची मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती

पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मनोहर गणपत चासकर यांची नांदेड येथील स्वामी रामनाथ तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली.

डी. के. वळसे पाटील

मंचर - आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मनोहर गणपत चासकर यांची नांदेड येथील स्वामी रामनाथ तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. चासकर यांच्या नियुक्तीचे आदेश पारित केले आहेत. डॉ. चासकर यांनी नुकताच कुलगुरु पदाचा पदभार स्वीकारला आहे.

डॉ. चासकर शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे आईवडिलांचे फारसे शिक्षण झालेले नसतानाही अत्यंत प्रतिकूल परस्थितीत त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हुतात्मा बाबू गेनू माध्यमिक विद्यालय महाळुंगे पडवळ येथे इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात बीएस्सी, एमएस्सी, तसेच पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.

पुणे येथील प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षण मंडळ कार्यकारिणीवरही त्यांनी काम केले आहे.

जपानमधील नागोया विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेट व नागोया विद्यापीठांमध्ये व जर्मनीच्या हॅनोवर या विद्यापीठांमध्ये व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून तसेच पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषद, अधिसभा, मॅनेजमेंट कौन्सिल पदावर काम केले आहे.

त्यांचा संशोधनाचा विषय नॅनो मटेरिअल्स अँड अँप्लीकेशन, फोटो कॅटलिसिस, सिंथेसिस ऑफ फोटो कॅटलिसिस अँड स्टडीइट्स एन्व्हायरोन्मेंटल इन द प्रोसेस ऑफ युव्ही लाइट या क्षेत्रात आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रातील तब्बल ३५ वर्षाच्या अनुभवानंतर त्यांची कुलगुरूपदी निवड झाली आहे. या निवडीचे आंबेगाव तालुक्यातून स्वागत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT