Yerwada Central Jail  sakal
पुणे

येरवडा कारागृहातील ओळख परेडमध्ये मी कोणालाही ओळखले नव्हते

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप असलेल्यांना मध्यवर्ती कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये ओळखले नव्हते.

प्रशांत पाटील

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप असलेल्यांना मध्यवर्ती कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये ओळखले नव्हते.

पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr narendra Dabholkar) यांची हत्या (Murder) केल्याचा आरोप असलेल्यांना मध्यवर्ती कारागृहात (Central jail) झालेल्या ओळख परेडमध्ये (Identity Parade) ओळखले नव्हते. मात्र केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरोपी अंदुरे आणि कळसकर यांची छायाचित्रे दाखविण्यापूर्वी वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये त्यांची छायाचित्रे पाहिली होती, असे या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने मंगळवारी (ता. २९) उलटतपासणी दरम्यान न्यायालयास सांगितले. महापालिकेच्या स्वच्छता विभागात कामाला असलेल्या या प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्याने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची साक्ष न्यायालयात दिली आहे.

डॉ. दाभोलकर यांच्यावर २० ऑगस्ट २०१३ रोजी अंदुरे आणि कळसकर यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरारी झाले, अशी साक्ष या कर्मचाऱ्याने नोंदवली होती.

त्यावर बचाव पक्षाचे वकील अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांनी या साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. या वेळी बचाव पक्षातर्फे साक्षीदाराला हल्लेखोरांचे वर्णन, घटनेच्या दिवशी डॉ. दाभोलकर आणि हल्लेखोरांचे कपडे, त्यावरील रक्ताचे डाग, ओळख परेड आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने विविध प्रश्न विचारण्यात आले. या खटल्यासंदर्भात येरवडा मध्यवर्ती कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये मी कोणालाही ओळखले नव्हते. न्यायालयात ज्या आरोपींना ओळखले, त्यांची छायाचित्रे पोलिसांनी त्यावेळी दाखविल्याचे मला आठवत नाही. सीबीआयने या आरोपींची छायाचित्रे मला दाखविण्यापूर्वी, मी वर्तमानपत्रांतील बातम्यांमध्ये या आरोपींची छायाचित्रे पाहिली होती. हत्येच्या घटनेनंतर त्याची माहिती पोलिसांना, रुग्णवाहिका, तसेच स्वच्छता विभागातील वरिष्ठांना सांगितली नव्हती. तसेच टिव्ही, वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये मारेकरी मिळत नसल्याचेही कळले होते. मी २ सप्टेंबर २०१३ पर्यंत कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याला मी घटना पाहिल्याचे सांगितले नव्हते, असे या साक्षीदाराने न्यायालयात सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी १२ एप्रिल रोजी होणार असून, बचाव पक्षाचे वकील ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड-वस्त या साक्षीदारांची उलटतपासणी घेणार आहेत.

सीबीआयने सादर केलेल्या साक्षीदाराला घटनास्थळाचे, डॉ. दाभोलकरांबाबतचे, गोळीबाराचे तपशील सांगता आलेले नाहीत. या साक्षीदाराला येरवडा कारागृहात ओळख परेडसाठी बोलावले असता, त्या ठिकाणी त्याने कोणत्याही आरोपीला ओळखले नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यावेळी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचीही ओळख परेड झाली होती, असा आमचा दावा आहे.

- ॲड. प्रकाश साळशिंगीकर, बचाव पक्षाचे वकील

एकापाठोपाठ एक उलटतपासणी घेण्याचा अर्ज फेटाळला -

या प्रकरणात आणखी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात येणार आहेत. या सर्व साक्षी आधी नोंदवून घ्याव्यात, मग त्यांची एकापाठोपाठ एक उलटतपासणी घ्यावी, अशी मागणी करणारा अर्ज बचाव पक्षातर्फे सीआरपीसी कायद्याच्या २३१ (२) कलमान्वये न्यायालयात सादर करण्यात आला. एका साक्षीनंतर उलटतपासणी घेतल्यास बचाव पक्षाचा युक्तिवाद सर्वांसमोर येईल, असा दावा बचाव पक्षाने केला. विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या अर्जास विरोध केला. या साक्षीदाराची उलटतपासणी निम्म्याहून पूर्ण झाली असून, अन्य साक्षीदार वेगळ्या मुद्द्यांवर साक्ष देणार आहेत. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. सूर्यवंशी यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने बचाव पक्षाचा अर्ज फेटाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast: दिल्ली स्फोटात आठ जणांचा मृत्यू, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक; जखमींचा आकडा मोठा, नेमकं काय घडलं?

Delhi Red Fort blast Live Update : दिल्लीत लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्रालयाने तातडीने बैठक बोलावली

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

Dharmendra News: पाच वर्षे खासदार राहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी राजकारण का सोडले? पडद्यामागं काय घडलं होतं? जाणून घ्या खरं कारण...

धर्मेंद्र यांना दाखल केलेल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलचा एका दिवसाचा खर्च किती येतो? एका रूमसाठी घेतलं जातं इतकं बिल

SCROLL FOR NEXT