dr neelam gorhe gave 60 kg modak to shrimant dagdusheth ganpati for cm eknath shinde birthday Sakal
पुणे

Pune : मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त नीलम गोऱ्हे यांनी ६० किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस केला अर्पण

शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने नीलम गोऱ्हे व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

समाधान काटे

शिवाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे ६० किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला.

शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने नीलम गोऱ्हे व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर कुरुमकर, शिवसेना महिला आघाडीच्या पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत आदी मान्यवरांच्या बरोबरच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती करून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आघाडीस यश मिळावे त्यांचे जास्तीजास्त खासदार,

आमदार निवडून यावेत व पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होवो अशी प्रार्थना केल्याचे सांगितले. तसेच येथे केलेल्या बहुसंख्य प्रार्थनां सफल झाल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Washim : प्रसूतीवेदनांनी विव्हळत होती महिला; डिलिव्हरीवेळी केली मारहाण, पोटावर दाब अन् बाळाचा मृत्यू, वाशिम रुग्णालयात नेमकं काय घडलं?

ENG vs IND: जसप्रीत बुमहबाबत मोठी अपडेट; पाचव्या कसोटीत न खेळण्याचं कारण वर्कलोड नाही, तर...

Kolhapur friendship Day: मैत्री दिनाचा सुपर संडे..!'तरुणाईच्या पर्यटनस्थळांना भेटी'; संभाजी महाराज, कवी कलश मैत्रीचे स्टेटस

Nitin Gadkari: विदर्भात उद्योगवाढीसाठी सीआयआयने अभ्यास करावा; नितीन गडकरी, केंद्र व राज्याचे सहकार्य असणार

Hasan Mushrif: मैत्री दिनादिवशी माझा सल्ला सतेज पाटलांनी ऐकावा: मंत्री हसन मुश्रीफ; वैयक्तिक मैत्री, पक्षीय राजकारण वेगवेगळे विषय

SCROLL FOR NEXT