Dr-Raghunath-Mashelkar 
पुणे

डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘अटल संस्कृती गौरव’ पुरस्कार

सकाळवृत्तसेवा

पुणे - संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव’ पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना दिला जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी ५:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून, पुरस्काराचे वितरण राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी असे आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक्-श्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘संवाद पुणे’ची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर अटलजींच्या रचना सादर करणार असून, अभिनेत्री भार्गवी चिरमुले नृत्य सादर करणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन सुनील महाजन यांनी केले असून, नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे 
यांचे आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : वन अँड ओन्ली शुभमन गिल! IPL मध्ये नोंदवला विराट, रोहितलाही न जमलेला विक्रम... सुदर्शनसह मिळून आणखी एक पराक्रम

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

LPL Rules: क्रिकेटमधील धक्कादायक नियम! फॉलोअर्सनुसार खेळाडूंची लीगमध्ये निवड होणार; नव्या नियमाने चाहत्यांमध्ये संताप

School Safety: नवीन तमलूर जि.प. शाळेची इमारत धोक्यात; पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतराची ग्रामस्थांची मागणी

Megablock: मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक, लोकलसह मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, पण कधी? पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT