baramati 
पुणे

डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांनी शस्त्रक्रीया करुन अनेकांना नवदृष्टी दिली - शरद पवार

मिलिंद संगई

बारामती शहर - डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी आजपर्यंत मोतीबिंदूच्या अडीच लाखांवर शस्त्रक्रीया करुन अनेकांना नवदृष्टी दिली आहे. समाज कायमच त्यांच्या ऋणात राहिल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, पुणे जिल्हा अंधत्व निवारण समिती, पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराच्या समारोप प्रसंगी पवार बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

गेले तीन दिवस सुरु असलेल्या शिबीरात 426  रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आला. शरद पवार यांनी लहाने व पारेख गावोगाव जाऊन रुग्णांवर मोफत शस्त्रक्रीया करण्याचे काम करतात त्याची प्रशंसा केली. बारामतीतही ते नियमितपणे येऊन फोरमच्या माध्यमातून ज्येष्ठांना नवदृष्टी देतात या बाबत पवार यांनी समाधान व्यक्त केले. 

प्रास्ताविकात सुनेत्रा पवार यांनी या शिबीराचा आढावा घेतला, या शिबीरासह मागील सर्व शिबीरांसाठी लहाने व पारेख डॉक्टरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरवर्षी अधिकाधिक रुग्णांवर शस्त्रक्रीयेचा फोरमचा प्रयत्न असतो, पुढील शिबीरांपासून रुग्णांची संख्या वाढविण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला. 

डॉ. तात्याराव लहाने यांनी शरद पवार यांच्यासमवेतच्या ऋणानुबंधांची माहिती देत त्यांनी सुरवातीपासूनच या कामात मोलाची मदत केल्याचे नमूद केले. या प्रसंगी या शिबीरासाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

दृष्टीदानाची चळवळ व्यापक व्हावी...
दरम्यान डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी सुरु केलेली ही दृष्टीदानाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, बारामती प्रमाणेच इंदापूर व इतर तालुक्यांनाही त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी भाषणात व्यक्त केली, त्याला डॉ. तात्याराव लहाने यांनी दुजोरा देत अशी शिबीरे करण्यास तयार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT