पुणे

Takli news and photo

CD

DHK26A04761
प्रा. डॉ. संतोष भुजबळ
--------------

मुख्य प्रशिक्षकपदी डॉ. संतोष भुजबळ
भारतीय कुस्ती संघाला मार्गदर्शन ः आशियाई स्पर्धेसाठी संधी
सकाळ वृत्तसेवा
टाकळी ढोकेश्‍वर, ता. १८ ः भाळवणी (ता.पारनेर) येथील रहिवाशी व औंध (जि.पुणे) येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ यांची भारतीय १७ वर्षे वयोगटातील ग्रीको रोमन कुस्ती संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.
भारतीय कुस्ती संघटनेने याबाबत अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली. व्हिएतनाममधील दा नांग येथे २७ ते ३१ मे दरम्यान होणाऱ्या १७ वर्षे वयोगटातील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय ग्रीको रोमन संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. भुजबळ जबाबदारी सांभाळणार आहेत. भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी पत्राद्वारे ही माहिती कळविले आहे.
या निवडीबद्दल प्रा. डॉ. भुजबळ यांची जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप, राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार रामदास तडस, सचिव हिंदकेसरी योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीप भोडवे, दिनेश गुंड, विलास कथुरे, दादाभाऊ सोनावळे यांनी अभिनंदन केले.
----------------
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड होणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशाचे प्रतिनिधित्व करताना खेळाडूंना सर्वोत्तम मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रासह पारनेर तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी कटिबद्ध आहे.
-प्रा. डॉ. संतोष भुजबळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT