Shripal-Sabnis
Shripal-Sabnis 
पुणे

अण्णा भाऊंच्या साहित्यात मानवतावादी दृष्टिकोन - डॉ. श्रीपाल सबनीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘मराठी साहित्यामध्ये दलित, शोषितांना नायक करणारे अण्णा भाऊ साठे हे पहिले साहित्यिक होय. त्यांच्या स्वप्नातील सभ्य, संपन्न, शोषणविरहित समाजाची निर्मिती करण्यासाठी, तसेच सर्व भेद मिटविण्यासाठी संघर्ष हा अटळ आहे आणि तो करावाच लागतो, हा त्यांच्या जीवनाचा व साहित्याचा सार आहे. यातच अण्णा भाऊंच्या साहित्यात मानवतावादी दृष्टिकोन आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

सत्यांश पब्लिकेशन आणि यशोदा पब्लिकेशनतर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशक मोहन वैराळ यांनी संपादित केलेल्या ‘साहित्यसम्राट’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सोपान खुडे, डॉ. शरद गायकवाड, श्रीराम दुर्गे, सुरेश पाटोळे, प्रकाशक प्रकाश वैराळे आदी उपस्थित होते.

‘अण्णा भाऊंचे साहित्य व त्यांचे विचार समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवेत. त्यांचे गुण, विचार ‘साहित्यसम्राट’ या पुस्तकात मांडण्यात आले आहेत. 
त्यांचे विचार प्रत्येक युवा वर्गाने जाणून घेतले पाहिजेत,’’ असे मत गोरखे यांनी मांडले. प्रास्ताविक संपादक प्रकाश वैराळ यांनी केले. सुरेश पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT