Dr. Suhas Palshikar  sakal
पुणे

Dr. Suhas Palshikar : आघाड्यांचे राजकारण गुंतागुंतीचे;राजकीय विश्‍लेषक डॉ. सुहास पळशीकर यांचे मत

‘‘देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपची ताकद कमी झालेली आहे. यापुढील काळात आघाड्यांचे राजकारण होणार आहे. यामुळे यापुढे भाजपलाही सन १९९०च्या दशकाच्या अखेरीप्रमाणे आता पुन्हा एकदा छोट्या पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपची ताकद कमी झालेली आहे. यापुढील काळात आघाड्यांचे राजकारण होणार आहे. यामुळे यापुढे भाजपलाही सन १९९०च्या दशकाच्या अखेरीप्रमाणे आता पुन्हा एकदा छोट्या पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यक्तीमहिमा कमी झाल्याने यापुढील काळात कोणत्या दिशेने राजकारण करायचे, हा प्रश्‍न भाजपसमोर निर्माण होईल. परिणामी येत्या काळात आघाड्यांचे राजकारण अधिकाधिक गुंतागुंतीचे होईल,’’ असे मत ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांनी गुरुवारी (ता. १३) एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे (पीआयसी) ‘सन २००२४ मधील लोकसभा निवडणुकीचे राजकीय परिणाम’ विषयावर प्रा. डॉ. पळशीकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘पीआयसी’चे संचालक अभय वैद्य उपस्थित होते.

डॉ. पळशीकर पुढे म्हणाले, ‘‘सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळालेल्या भाजपला आपल्या त्यावेळेच्या सहकाऱ्यांच्या मदतीने किती यश मिळाले आणि स्वत:च्या क्षमतेवर किती यश मिळाले, हा खरा प्रश्न होता. त्या गोष्टीचा निकाल सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत लागला असून, भाजपची ताकद कमी झालेली आहे.

मात्र लोकसभेच्या निकालांचा जसाच्या तसा परिणाम महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता कमी आहे. कारण तिथे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्या वेळेचे स्थानिक घटक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे आघाड्यांचे राजकारण अधिक गुंतागुंतीचे होत जाईल. कारण विधानसभा निवडणुकीच्या काळात इतर स्थानिक पक्ष पुढे सरसावतील आणि महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडेही आपापला जागेचा वाटा मागतील.’’ व्याख्यानानंतर प्रश्‍नोत्तरे झाली. यावेळी संगोराम यांचेही भाषण झाले. वैद्य यांनी प्रास्ताविक केले. कोयना लाहिरी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डिनोने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा ‘मोरया’ झाला असता, एकनाथ शिंदे सभागृहात संतापले! विरोधकांचेही टोमणे

"कुर्ला टू वेंगुर्ला"मधून उलगडणार 'एका लग्नाची गोष्ट'; मुख्य भूमिकेत दिसणार 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेता

Latest Marathi News Updates : अमरावतीमध्ये आरोग्य परिचारिकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

farmer Success Story :'दोडक्याने दाखवली कर्जमुक्तीची वाट'; जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पादन खर्चात झाली बचत

Hinjewadi Connectivity: ‘आयटी’ला मिळणार जलद ‘कनेक्टिव्हिटी’; रस्ता रुंदीकरणाचा फायदा

SCROLL FOR NEXT