नालेसफाईत ८३ लाख रुपयांची अतिरिक्त बिले
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नगरसेवक अनंत जाधव यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : महापालिकेतील उपलब्ध कागदपत्रांच्या पडताळणीत नालेसफाईच्या कामात सुमारे ८३ लाख रुपयांची अतिरिक्त बिले अदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सभागृहातील भूमिका आणि कागदपत्रांतील वस्तुस्थितीत तफावत असल्याने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक अनंत जाधव यांनी केली आहे.
मागील वर्षीच्या नालेसफाईच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता. सर्वसाधारण सभेत नगरसेवक अनंत जाधव यांनी या मुद्द्यावर ‘लक्षवेधी’ मांडून प्रशासनाला धारेवर धरले होते. सभागृहात संबंधित अधिकारी तथा नगरअभियंता सारिका आकुलवार यांनी मक्तेदाराला अतिरिक्त बिले दिली नसल्याचे सांगितले होते. तर आयुक्तांनी चुकीची बिले निघाल्याचे सांगितले होते. मात्र, कागदपत्रांवरून तब्बल ८३ लाख रुपयांची अतिरिक्त बिले अदा झाल्याचे स्पष्ट झाल्याचे जाधव यांनी सांगितले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.