पुणे - नाट्य प्रशिक्षण घेताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्र.
पुणे - नाट्य प्रशिक्षण घेताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्र. 
पुणे

‘एनडीए’च्या छात्रांना नाटकाचे धडे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - संरक्षण दलांसाठी अधिकारी तयार करणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) छात्रांना नाटकांचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पुण्यातील स्वतंत्र थिएटरकडे आली आहे. लष्करी शिस्तीबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हे नाट्य प्रशिक्षण देण्यात येत आहे.

‘एनडीए’बरोबर स्वतंत्र थिएटरचा सामंजस्य करारही झाला आहे. ‘ताज महल का टेंडर’ हे नाटकही सादर झाले आहे. स्वतंत्र थिएटरच्या संचालक धनश्री हेबळीकर म्हणाल्या की, प्रबोधिनीकडून वर्षाला दोन नाटके बसविली जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहोत. संरक्षण दलांतील प्रशिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, या हेतूने प्रबोधिनीने आम्हाला संधी दिली. त्यानुसार हा उपक्रम राबविला जात आहे.

‘आठवड्यातून दोन दिवस हे प्रशिक्षण दिले जाते. संवादकौशल्य, कायिक-वाचिक अभिनय आणि मन-शरीर यांचा समन्वय, याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. त्यासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे. पथनाट्यविषयक प्रशिक्षणाचाही अंतर्भाव यात आहे. ऑक्‍टोबरमध्ये ‘ताज महल का टेंडर’ हे नाटक सादर झाले. आता ‘इस नाटक का कोई जवाब नहीं’ या सामाजिक विषयावरील नाटकाच्या तालमी घेत आहोत.’’

थिएटरचे संस्थापक युवराज म्हणाले, ‘‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये देशातील विविध प्रांतांतून विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यांची सांस्कृतिक गरज म्हणून नाट्य प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यासाठी प्रबोधिनीबरोबर करार केला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना हिंदी नाटकाचे धडे आम्ही देत आहोत. यातून राष्ट्रीय एकात्मता आणि अन्य सामाजिक विषयांवरील नाटकांचे सादरीकरण करण्याची संधी त्यांना मिळेल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT