drdo Pradeep Kurulkar bail application heard on August 25 court pune esakal
पुणे

Pradeep Kurulkar : कुरुलकरांच्या जामीन अर्जावर २५ ऑगस्ट रोजी म्हणणे मांडावे...

सरकारी वकील आणि एटीएस अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाने २५ ऑगस्ट रोजी उत्तर दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मागील चार महिन्यांपासून कारागृहात असलेल्या डॉ. कुरुलकरने जामिनासाठी केलेल्या अर्जावर विशेष न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांच्या न्यायालयासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कुरुलकर हा व्हिडिओ कॉंन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर झाला. जामीन अर्जावर लेखी जबाब सादर करण्यास सांगितले होते.

सरकारी वकील आणि एटीएस अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. मात्र एड. ऋषिकेश गानू यांनी या मागणीला विरोध दर्शविला. या प्रकरणात सात जुलैला दोषारोपपत्र दाखल केले आहे. एटीएसला पुरेसा वेळ मिळाला आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

त्यावर एटीएसने मुंबई येथील कार्यालयातून म्हणणे सादर केल्यानंतर म्हणणे सादर करु, असे तपास अधिकारी सुजाता तानवडे यांनी न्यायालयात सांगितले. त्याला बचाव पक्षाने विरोध दर्शविला. आरोपी मे महिन्यापासून कारागृहात असून, जुलैमध्ये आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे सरकारी वकिलांना मुदत देणे योग्य होणार नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT