drdo scientist pradeep kurulkar love affair whatsapp chatting ats crime pune Sakal
पुणे

Pradeep Kurulkar : डॉ. प्रदीप कुरुलकरचे विवाहबाह्य संबंध; महिलेसोबतचे चॅटिंग एटीएसला मिळाले

झारा आणि डॉ. कुरुलकर यांच्यात झालेले चॅटिंग देखील पुढे आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर ॲण्ड डीई) या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याची बाब समोर आली आहे.

दोघांत झालेले व्हॉटसअप चॅटिंग तपास यंत्रणेला मिळालेले आहे, असे या प्रकरणी दाखल असलेल्या दोषारोपपत्रात नमूद आहे. दरम्यान याबाबत महिलेने अद्याप कोणतीही तक्रार दिलेली नाही. तिने तक्रार दिल्यास डॉ. कुरुलकर याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात एका किंवा त्यापेक्षा जास्त कलमांची वाढ होवू शकते.

डॉ. कुरुलकर याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखविण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांच्या व्हॉटस्अप चॅटिंगमधून यापूर्वी स्पष्ट झाले आहे. झारा आणि डॉ. कुरुलकर यांच्यात झालेले चॅटिंग देखील पुढे आले आहे.

त्यानंतर आता डॉ. कुरुलकर यांचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे या प्रकरणी दाखल असलेल्या दोषारोपपत्रातून स्पष्ट होते. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात आत्तापर्यंत ७० हुन अधिक जणांचे जबाब नोंदवून गोपनीय कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT