Katraj Traffic
Katraj Traffic Sakal
पुणे

Katraj Traffic : वाहनचालक त्रस्त! बेशिस्त पीएमपीएल चालकांमुळे कात्रज चौकात नित्याचीच कोंडी

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - कात्रज चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. वाहतूक पोलिस आणि पीएमपीएलच्या चालकांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव आणि पीएमपीएलच्या चालकांकडून नियमांना दाखविण्यात येत असलेली केराची टोपली ही कोंडीची मुख्य कारणे ठरत आहेत.

चौकात होणाऱ्या कोंडीमुळे पीएमपीएमएल आगाराकडून येणाऱ्या बसेसना गुजरवाडी बस स्थानकावरून वळवून कात्रज बसथांब्यावर आणण्याचा आदेश आहे. मात्र, पीएमपीएमएल चालकांकडून सर्रासपणे हा नियम धाब्यावर बसविण्यात येतो.

पीएमपीएमएल चालकांच्या नियम धुडकावण्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागतात. कात्रज चौकात रिक्षा, बसदेखील थांबत असतात त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात या चौकात गर्दी करतात. उजवीकडे बसेस व अवजड वाहनांना वळण्यास बंदी असताना त्याचेही पालन होताना दिसत नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणांवर वाहतूक कोंडी होते आणि दोनशे मीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना अर्ध्या तासापेक्षा जास्त कालावधी मोजावा लागतो.

कोंढवा रस्ता, सातारा रस्ता, नवले पूल आणि पुणे शहरातून एकाच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामध्ये सकाळी आणि संध्याकाळच्यावेळी अधिकची भर पडते.

प्रतिक्रिया

कात्रज डेपोच्या वाहनचालकांने अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास आम्ही त्यास पाचशे रुपयांचा दंड आकारतो. त्यामुळे अशा प्रकारांना आता आळा बसला आहे. परंतु, काही नवीन डेपोचे नवीन वाहनचालक आल्यास त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास ते तपासून कडक कारवाई करण्यात येईल.

- गोविंद हांडे, आगारप्रमुख, कात्रज

पीएमपील चालकांना कुठलाही नियम नाही. ते कुणाला जुमानत नाहीत. सिग्नलही कधीच पाळत नाहीत. पीएमपीमुळे दुचाकीचालकांना गाडी चालविणे कठीण होते. पीएमपीएल चालकांच्या मुजोरपणामुळे कात्रज चौकातील वाहतुकीचा वारंवार बोजवारा वाजत आहे.

- पांडुरंग गदळे, स्थानिक नागरिक

या अनुषंगाने पीएमपी चालकांसोबत एकत्रित बैठक लावण्यात आली आहे. त्या बैठकीत वाहनचालकांना सूचना देण्यात येतील. तरीही यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

- सविता ढमढेरे, पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ वाहतूक शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT