पुणे

खवय्यांची चंगळ 'झोमॅटो गोल्ड'ने केली कमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हॉटेल व्यावसायिकांकडून होत असलेला प्रखर विरोध लक्षात घेऊन "झोमॅटो गोल्ड'ने आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल केला असून, ग्राहकांना दिवसातून एकदाच झोमॅटो गोल्डची सुविधा वापरता येणार आहे. सवलतींची खैरात झोमॅटोने कमी केली असून, कार्डची किंमतही वाढवली आहे.

झोमॅटोचे कार्ड असल्यावर ग्राहकांना एका डिशवर एक डिश फ्री मिळत होती. त्यामुळे जवळपास पन्नास टक्‍क्‍यांत हॉटेलिंग सुरू झाले होते. पाच-सहा मित्रांचा ग्रुप असेल आणि त्यात चौघांकडे झोमॅटोचे कार्ड असेल तर, किरकोळ रकमेत ड्रिंक्‍स आणि जेवण होत होते. मात्र, मॉडेल परवडत नसल्याचे दिसून आल्यावर शहरातील अनेक व्यावसायिकांनी झोमॅटो गोल्डमधून लॉग ऑऊट केले होते.

पुण्यासह मुंबई, दिल्ली, बंगळरू, हैदराबादमधूनही हॉटेल व्यावसायिक लॉग ऑऊट झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर झोमॅटोने त्यांच्या हॉटेल पार्टनरला गुरुवारी ई-मेल पाठवून नव्या बदलांची माहिती दिली. 15 सप्टेंबरपासून हे नवे बदल लागू होणार आहेत.

झोमॅटोने केला असा बदल...

- झोमॅटो गोल्ड कार्ड दिवसातून एकदाच वापरता येणार
- एका टेबलवर कमाल दोन कार्डचा वापर करता येणार
- एका कार्डवरून एकालाच वापर करता येणार, मल्टिपल लॉगइनची सुविधा केली रद्द
- झोमॅटो कार्डची मेंबरशिप 1000 ऐवजी आता 1800 रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT