Duty performed after birthday celebration fireman Malvadkar pune fire briogade sakal
पुणे

Pune News : वाढदिवसाचे औक्षण झाल्यानंतर बजावले कर्तव्य!

अग्निशामक जवान माळवदकर यांची निष्ठा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोंढव्यातील कौसरबाग परिसरात भंगार मालाच्या गोदामासह शेजारी असलेल्या गॅरेजला शनिवारी पहाटे आग लागली. यात गोदाम आणि गॅरेजमधील चार वाहने भस्मसात झाली. दरम्यान, आगीची माहिती समजताच कोंढवा अग्निशामक दलातील जवान दशरथ माळवदकर यांनी वाढदिवसाचे औक्षण होताच घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, भंगार माल आणि चारचाकी वाहने जळाली.

कौसरबाग परिसरातील गोदामाला शनिवारी सकाळी आग लागल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला कळविली. त्यानंतर जवान तेथे त्वरित दाखल झाले. आगीचा भडका उडाल्याने जादा कुमक मागविण्यात आली. आठ बंबांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

दरम्यान, माळवदकर यांचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांच्या घरी औक्षणाचा कार्यक्रम होता. मात्र, आगीची माहिती समजताच ते घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या मदतकार्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

जवानांच्या तत्परतेमुळे आग इतरत्र न पसरता धोका टळला व आग पूर्ण आटोक्यात आली, अशी माहिती कोंढवा अग्निशामक दलाचे प्रमुख समीर शेख यांनी दिली.

केंद्रप्रमुख समीर शेख, सुनील नाईकनवरे, फायरमन योगेश पिसाळ, रफिक शेख, शंकर नाईकनवरे, सागर दळवी, प्रथमेश निकम, सागर निकम, दशरथ माळवदकर, तांडेल नीलेश लोणकर यांनी ही आग आटोक्यात आणली. या सहकाऱ्यांनी माळवदकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कामावरील त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले.

‘वाढदिवस असल्याने सुटी घ्या’, असा आग्रह कुटुंबीयांनी केला होता. मात्र, आग लागल्याचे समजल्याने ‘मला कामावर जावे लागेल. आपण नंतर वाढदिवस साजरा करू’, असे मी त्यांना समजावून सांगितले. त्यामुळे सकाळी सहा वाजता कुटुंबीयांनी माझे औक्षण केले आणि मी दुर्घटनास्थळी दाखल झालो.

- दशरथ माळवदकर, फायरमन, कोंढवा अग्निशमन केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Strait of Hormuz Toll : इराण भारताच्या जहाजांकडूनही वसूल करणार २० लाख डॉलरचा टोल टॅक्स? सरकारने दिली 'ही' महत्त्वाची माहिती

Phaltan News: नीरा कालव्‍यात बहीण-भावाचा मृतदेह; फलटणमधून मंगळवारी झाले होते बेपत्ता, दाेघांबाबत नेमकं काय घडलं!

Parbhani News: खतांचा साठा कागदोपत्री; शेतकरी हवालदिल; ‘सकाळ’च्या स्टिंगमध्ये खत टंचाईचे वास्तव उघड

Satara Politics: कामेश कांबळे, लता कर्णे, ऋतुजा जगताप यांना अपात्र करा; राष्ट्रवादीची जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका, निकालाकडे लक्ष!

Chhatrapati Sambhajinagar: तहसीलदार गैरहजर, कारभार वाऱ्यावर; डिजिटल स्वाक्षरी बंद झाल्याने प्रमाणपत्रांचे काम ठप्प, सिल्लोडकर त्रस्त

SCROLL FOR NEXT