Eco-Ganpati
Eco-Ganpati 
पुणे

‘इको बाप्पा’ बनविण्यात रमली मुले व पालक

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आज दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’तर्फे शहरातील विविध शाळांमध्ये इको गणपती बनविण्याची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेला पालक व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यशाळेचे प्रायोजक फिनिक्‍स मार्केटसिटी, संडे सायन्स स्कूल, क्‍लारा ग्लोबल स्कूल, इडीफाय इंटरनॅशनल स्कूल आणि अभिरुची मॉल ॲण्ड मल्टिप्लेक्‍स हे आहेत. पुण्यातील स्ट्रोक्‍स फाउंडेशनचे चेतन पानसरे, स्नेहल कुलकर्णी आणि टीमने मुलांना गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर सेंट्रल मॉलच्या मार्केटिंग विभागातील श्‍वेता वर्मा व अरुण रामानन यांनी सहकार्य केले. 

याबाबत अभिरुची मॉल ॲण्ड मल्टिप्लेक्‍सचे संचालक यशोधन भिडे म्हणाले, ‘‘पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. अशा उपक्रमांतून ती होत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’ 

‘गेल्या काही वर्षांत वाढत गेलेल्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. अशा उपक्रमांतून पुढील पिढीला पर्यावरणपूरक सणांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे,’’ 

असे हिंजवडीतील इडीफाय इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गौतम बुधराणी म्हणाले. ‘सकाळ’ नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांतून नवीन पिढीला मार्गदर्शन करत असतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना मुलांमध्ये रुजविली पाहिजे, असे मत क्‍लारा ग्लोबल स्कूलच्या संचालिका सारिका बाबर यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT