पुणे

उच्चशिक्षित मुस्लिम युवकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जातेय

CD

उच्चशिक्षित मुस्लिम तरुणांना
जाणीवपूर्वक लक्ष्य: ओवेसी
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता.९ : नाशिक येथील टीसीएसमधील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी उच्चशिक्षित मुस्लिम युवकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. दरम्यन, निदा खानची पोलिस चौकशी करत आहे. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. नीदा खानची निर्दोष मुक्तता होईल, असा बचावही ओवेसींनी केला.
एखाद्यावर आरोप झाले म्हणजे तो गुन्हेगार ठरत नाही. प्रकरण न्यायालयात गेले असून न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य असला पाहिजे, असे ओवेसी यांनी सांगितले. सत्ताधारी आणि काही पक्ष स्वतः न्यायाधीश असल्यासारखे वागत आहेत. तपास पूर्ण होण्यापूर्वीच आरोपींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. नाशिक टीसीएस प्रकरणाबाबत अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे सांगत त्यांनी न्यायप्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या प्रकरणावरून एमआयएम पक्षावर होत असलेल्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले. जाणीवपूर्वक मुस्लिम समाज आणि एमआयएमला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT