uddhav thackeray 
पुणे

Pune Bypoll Election : कसबा-चिंचवडमध्ये यंत्रणांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न ; ठाकरे गटाचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू आहे. कसबा आणि चिंचवडच्या जागा भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत. पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासणे आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. तर चिंचवडमध्ये देखील भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यात लढत आहेत.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. पुण्यात मतदान टक्केवारी कमी झाली,यावर संजय राऊत म्हणाले, ते पुणे आहे त्यामुळे पुण्याच्या पद्धतीने मतदानाला सुरूवात होईल. पुणेकर एकदा का मैदानात उतरले तर तुम्हाला मोठ्या रांगा दिसतील. प्रचाराच्या दरम्यान चिंचवड आणि कसब्यात मोठा जल्लोष दिसला. त्यामुळे पुणेकर घरी बसणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

चिंचवड पोटनिवडणुकीत धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊत म्हणाले, धक्काबुक्की होईल, वाद होतील. कारण सरकारकडून पाच ते सहा मंत्री मतदार संघात जाऊन बसले आहेत. याची काही गरज आहे का?. प्रशासनावर. यंत्रणांवर दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पराभवाची भीती दिसली की लोकांना गोंधळ घालण्यास प्रवृत्त केल्या जात आहे.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

आजचे राशिभविष्य - 18 सप्टेंबर 2025

सोलापुरात नवरात्रोत्सवही डीजेमुक्तच होणार! मध्यवर्ती मंडळांच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून ‘डीजे’ची नाही मागणी; पोलिस आयुक्त म्हणाले, साऊंड स्पीकरला परवानगी, पण...

अग्रलेख : चालढकल पुरे

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT